Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:01 IST2026-04-06T14:01:17+5:302026-04-06T14:01:17+5:30
Ashok Kharat : भोंदुबाबा अशोक खरात याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) बाहेर आल्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
भोंदुबाबा अशोक खरात याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) बाहेर आल्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या संदर्भात विरोधकांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे. खरात प्रकरणी नेमकी त्याच्यावर कारवाई सुरू आहे की कोणाला टार्गेट करण्यासाठी हे प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे असा संशय निर्माण होतो.
सीडीआर जर अशा प्रकारे कोणाला मिळत असतील तर ते जाणीवपूर्वक देण्यात आले की काय? असा संशय निर्माण होतो. सरकारने या प्रकरणी खुलासा करावा अशी मागणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. खासगी माहितीचे संरक्षण करणे ही यंत्रणेची जबाबदारी आहे. सीडीआर बाहेर येणे म्हणजे गोपनीयतेचा भंग आहे. सरकार यावर काय भूमिका घेणार? असा प्रश्न नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. नेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत, राज्यात कायद्याचे राज्य आहे का? कोणाचाही डेटा सहज उपलब्ध होतो? असा सवाल करत घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मी व्हॉट्सअप वर @andharesushama , @rautsanjay61 आणि @shindespeaks यांना उद्या सकाळी, घरी चहाला येण्याचे आमंत्रण दिले व पत्ता देखील पाठवला आहे. पत्ता लवकर मिळावा म्हणून google link पण पाठवली आहे https://t.co/r6dESRJ50tpic.twitter.com/9yA1vF79Qf
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 5, 2026
"कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
भोंदू खरातने पुण्यात मुलीच्या नावे १ कोटी ३० लाखांचा घेतला फ्लॅट; कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघड
एआयच्या माध्यमातून डिटेल्स काढले - अंजली दमानिया
माझ्याकडे सीडीआर हे एआयच्या माध्यमातून प्राप्त झाले आहेत. एआय वापरून मी नंबर कसे शोधले, ते खरे आहेत हे कसे चेक केले, तुम्ही जे नंबर सांगाल ते तुमच्या समोरच शोधून त्यांची पूर्ण माहिती मी द्यायला तयार आहे, असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी दिले आहे.
गुप्तधनाचा मोह, प्रगतीची आस; संकटातून बाहेर पडण्यासाठी महिला भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात
सुषमा अंधारे, संजय राऊत आणि शशिकांत शिंदे यांनी माझ्या घरी चहाला याव. हे सगळे मी त्यांना उलगडून दाखवेन, मात्र त्यानंतर त्यांनी खरात या विषयावर चर्चा करावी असेही दमानिया यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. दरम्यान, आपण या प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना भेटून ही माहिती त्यांनाही देणार असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे.