हॉटेलच्या खोलीत पतीला गर्लफ्रेंडसह रंगेहाथ पकडलं; पत्नीने धू धू धुतले दोघांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 22:11 IST2021-12-10T22:10:53+5:302021-12-10T22:11:10+5:30
Husabnad Caught with Girlfriend : बर्नपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत मज्जा मारणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर पत्नीने पती आणि गर्लफ्रेंडची भररस्त्यात धु धू धुलाई केली. हातात हेल्मेट घेऊन पत्नीनं दोघांना धू धू धुतले.

हॉटेलच्या खोलीत पतीला गर्लफ्रेंडसह रंगेहाथ पकडलं; पत्नीने धू धू धुतले दोघांना
पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये गुरुवारी लव्ह ट्रँगलमुळे निर्माण झालेला गोंधळ पाहायला मिळाला. आसनसोलच्या एका हॉटेलमध्ये पतीला गर्लफ्रेंडसोबत असताना पत्नीनं रंगेहाथ पकडलं. त्यानंतर पत्नीनं पती आणि गर्लफ्रेंडची भररस्त्यात धुलाई केली.
बर्नपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत मज्जा मारणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर पत्नीने पती आणि गर्लफ्रेंडची भररस्त्यात धु धू धुलाई केली. हातात हेल्मेट घेऊन पत्नीनं दोघांना धू धू धुतले. जमलेल्यांनी याचा व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पतीची गर्लफ्रेंड महिलेला भररस्त्यात पत्नीने मारहाण केली. पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला हेल्मेटने मारहाण केली. नंतर दोघांना आसनसोल दक्षिण पोलीस चौकीत नेले.
पोलिसांनी पती आणि गर्लफ्रेंडला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्नपूर येथील रहिवासी असलेला मोहनलाल हा आसनसोल बर्नपूर रोडवरील पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये एका महिलेसोबत थांबला होता. पत्नीने मोहनलालचा मागोवा घेत तिने हॉटेलच्या खोलीत मोहनलालला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला रंगेहाथ पकडलं. पत्नीनं त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. रस्त्यात पळवत पळवत पत्नीने पतीला देखील मारहाण केली.