चार दिवसांनी होतं लग्न! वडील आणि भावाने सर्वांसमोर केली मुलीची हत्या; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:17 IST2025-01-15T13:12:08+5:302025-01-15T13:17:26+5:30

घरच्यांनी स्थळ शोधलं आणि लग्न ठरवलं. पण, तरुणीचा या लग्नाला विरोध होता. पोलीस आणि इतर लोकांसमोर तरुणीने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर वडिलांनी आणि तिच्या चुलत भावाने तिची हत्या केली. 

Honour killing News Father and brother killed the girl in front of police officer | चार दिवसांनी होतं लग्न! वडील आणि भावाने सर्वांसमोर केली मुलीची हत्या; कारण...

चार दिवसांनी होतं लग्न! वडील आणि भावाने सर्वांसमोर केली मुलीची हत्या; कारण...

Honour Killing news: २० वर्षीय तरुणीची तिच्या वडील आणि भावाने गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चार दिवसांनी तरुणीचे लग्न होते. पण, घरच्यांनी ठरवलेल्या लग्नाला तिचा विरोध होता. सर्वांसमोर नकार दिल्याने आधी संतापलेल्या वडिलांनी आणि नंतर भावानेही गोळ्या झाडल्या. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पोलीस अधिकारी, इतर लोकांसमोर घडलं. मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये ही घटना घडली आहे. हे प्रकरण ऑनर किलिंगचे असल्याचे समोर आले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तनू गुर्जर असे ऑनर किलिंगचा बळी ठरलेल्या तरुणीचे नाव आहे. तर महेश गुर्जर असे तिच्या वडिलाचे, तर राहुल गुर्जर असे चुलत भावाचे नाव आहे. तनू गुर्जरला आग्रा येथे राहणाऱ्या विकी मावई याच्यासोबत लग्न करायचं होतं. 

तनूने सोशल मीडियावर शेअर केला होता व्हिडीओ 

तनू गुर्जरचे चार दिवसांनी म्हणजे १८ जानेवारी रोजी लग्न होते. घरात लग्नाची लगबग सुरू झाली होती. पण, तनूला विकीसोबतच लग्न करायचं होतं. घरचे बळजबरीने दुसरीकडे लग्न लावून देत होते. 

तनूने कुटुंबाकडून सुरू असलेल्या या मुस्कटदाबीबद्दल एक व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.

व्हिडीओमध्ये तनू म्हणत आहे की, "मला विकीसोबत लग्न करायचं आहे. माझ्या घरचे सुरूवातीला तयार झाले होते, पण नंतर त्यांनी नकार दिला. ते मला दररोज मारहाण करत आहेत आणि मला मारून टाकण्याची धमकी देत आहेत. मला जर काही झालं, तर यासाठी माझे कुटुंब जबाबदार असेल."    

तनू आणि विकीचे प्रेमसंबंध

तनूने ज्या विकीचा उल्लेख केला आहे, तो उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी आहे. तनू आणि विकी मागील सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 

तनूचा व्हिडीओ व्हायरल झाला अन्...

कुटुंबाकडून छळ केला जात असल्याचा तनूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह हे कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी आणि हा वाद सोडवण्यासाठी तनूच्या घरी गेले. यावेळी बैठक बोलवण्यात आली. 

बैठक सुरू असतानाच तनूने घरात राहण्यास नकार दिला. कुटुंबाकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून घराबाहेर पडलेल्या महिलांसाठी सरकारने वन स्टॉप सेंटर सुरू केली आहेत. तिथे मला राहुद्या अशी मागणी तिने केली. 

दरम्यान, तनूसोबत खासगीमध्ये बोलायचं आहे, यासाठी तिचे वडील आग्रह करू लागले. पण, त्यानंतर महेश गुर्जर यांनी लगेच गावठी पिस्तुल काढले आणि तनूच्या छातीत गोळी झाडली. त्यानंतर चुलत भाऊ राहुलने तिच्या कपाळ, मान आणि डोळे आणि नाकाच्या मध्ये असलेल्या भागावर गोळ्या झाडल्या. तनू खाली कोसळली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. 

पोलीस अधिकाऱ्यांवर रोखले पिस्तुल

तनू खाली कोसळताच राहुलने पोलीस अधिकाऱ्यांवर आणि उपस्थित लोकांच्या दिशेने पिस्तुल रोखले. त्यानंतर तो घटनास्थळावर पसार झाला. मात्र, पोलिसांनी तनूच्या वडिलांना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, राहुल गुर्जरचा शोध घेत आहेत. 

Web Title: Honour killing News Father and brother killed the girl in front of police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.