सोशल मीडियात फोटो व्हायरल करण्याचा नाद नडला; युवकाचा गोळी लागून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 14:57 IST2022-01-31T14:56:35+5:302022-01-31T14:57:37+5:30
Crime News : मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.

सोशल मीडियात फोटो व्हायरल करण्याचा नाद नडला; युवकाचा गोळी लागून मृत्यू
अहमदनगर : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यासाठी तोंडात पिस्टन घालून व्हिडिओ तयार करत असताना गोळी लागून मृत्यू झाला.
राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात घडली ही घटना घडली. प्रदिप एकनाथ पागिरे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव. राहुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यासाठी तोंडात गावठी कट्टा घालून फोटो शूट करत असताना अचानक गोळी सुटली. यामुळे पागिरे यांचा मृत्यू झाला असून,त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.