पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार, मारेकरी दारुड्या पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 14:45 IST2022-10-13T14:45:03+5:302022-10-13T14:45:55+5:30

पत्नीचा मृत्यू : अकोला जिल्ह्यातील शेकापूर गावातील घटना!

Hit wife on head with ax, killer drunken husband arrested in akola | पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार, मारेकरी दारुड्या पतीला अटक

पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार, मारेकरी दारुड्या पतीला अटक

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या शेकापूर येथे एका दारुड्या पतीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटे उघडीस आली. 

शेकापूर येथील गोपीचंद आणि संगीताचा विवाह मागील ८ वर्षांपूर्वी झाला गोपीचंदला दारूचे व्यसन होते या व्यसनातून तो सतत संगीताला मारहाण करायचा, तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. या प्रकरणात संगीताने यापूर्वी तीन वेळा पातूर पोलिसांकडे तक्रारीही केल्या होत्या मात्र, पोलिसांनी ठोस कारवाई केली केली नाही. सततच्या भांडणामुळे ती शेकापुर येथे आपल्यामाहेरी  दोन मुलांसह माहेरी राहत होती. काही कालावधीनंतर संगीता गोपीचंद सोबत नांदायला गेली. त्यानंतरही त्यांच्यात वाद व्हायचे. बुधवार १२ ऑक्टोबरला संध्याकाळी या दोघांमध्ये भांडण झाले. भांडणामुळे रागातच झापेलेल्या गोपीचंदने गुरूवारी पहाटे संगीताच्या डोक्यात, मानेवर आणि पायावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात संगीता गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणात संगीताचे वडील रामचंद्र देवा राठोड यांच्या तक्रारी वरून खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून मारेकरी पतीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Hit wife on head with ax, killer drunken husband arrested in akola