बाणेरमध्ये स्पाच्या नावाखाली चालविणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 11:23 IST2019-01-30T11:22:38+5:302019-01-30T11:23:07+5:30

बाणेर येथील बेसील हौसिंग सोसायटीतील रो हाऊस मध्ये थाई स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती .

High profile sex racket busted under the name of Spa in Baner | बाणेरमध्ये स्पाच्या नावाखाली चालविणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

बाणेरमध्ये स्पाच्या नावाखाली चालविणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल रेक्स रॅकेट चालविणाऱ्या बाणेर येथील थाई स्पाचा पर्दाफाश सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे. याप्रकरणी स्पा चालविणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून थायलंडच्या दोन तरुणीसह तिघींची सुटका करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
जयदीप रवींद्र अणेचा (वय ३६, रा़ टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस उपनिरीक्षकांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बाणेर येथील बेसील हौसिंग सोसायटीतील रो हाऊस मध्ये थाई स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी तेथे पोलिसांनी छापा  घातला.  त्यात तीन तरुणी आढळून आल्या. त्यातील दोघी थायलंडच्या असून एक लावोस देशातील आहे. या तिघांना थेरपीस्ट म्हणून नोकरीवर ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.  हा स्पा चालविणाऱ्या जयदीप अणेचा याला पोलिसांनी अटक केली आहे. 

Web Title: High profile sex racket busted under the name of Spa in Baner