भारत - नेपाळ सीमेवर हाय अलर्ट; उत्तर प्रदेशात घुसले दोन दहशतवादी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 04:25 PM2020-01-05T16:25:18+5:302020-01-05T16:27:03+5:30

भारत - नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

High alert on India - Nepal border; Two terrorists of IS entered Uttar Pradesh | भारत - नेपाळ सीमेवर हाय अलर्ट; उत्तर प्रदेशात घुसले दोन दहशतवादी

भारत - नेपाळ सीमेवर हाय अलर्ट; उत्तर प्रदेशात घुसले दोन दहशतवादी

googlenewsNext
ठळक मुद्देअब्दुल समद व इलियास हे दोन पाहिजे असलेले दहशतवादी उत्तर प्रदेशात घुसले असून ते नेपाळच्या सीमेवरून पळून जाऊ शकतात. हे दोघेही भारत - नेपाळ सीमेला लगत असलेल्या जिल्ह्यामार्गे नेपाळमध्ये पलायन केले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बस्ती - आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दोन दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशात प्रवेश केल्याच्या गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर भारत - नेपाळच्या सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बस्ती क्षेत्रातील पोलिस महानिरीक्षक आशुतोष कुमार यांन सांगितले की, गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल समद व इलियास हे दोन पाहिजे असलेले दहशतवादी उत्तर प्रदेशात घुसले असून ते नेपाळच्या सीमेवरून पळून जाऊ शकतात. त्यामुळे भारत - नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थनगरसह नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांत पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढवला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हे दहशतवादी भारत - नेपाळ सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातून नेपाळमध्ये पळून जाऊ शकतात. त्यांच्या शोधार्थ संपूर्ण गोरखपूर झोनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.


दहशतवादी शेवटचे सिलिगुडीमध्ये दिसले होते
हे दोन दहशतवाद्यांना पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे शेवटचे दिसले होते. हे दोघेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशात दाखल झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि हे दोघेही भारत - नेपाळ सीमेला लगत असलेल्या जिल्ह्यामार्गे नेपाळमध्ये पलायन केले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title: High alert on India - Nepal border; Two terrorists of IS entered Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.