साप चावल्याचा केला होता बनाव, पत्नीच्या डोक्यात लाकूड घालून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 17:41 IST2022-01-02T17:26:29+5:302022-01-02T17:41:35+5:30
Murder Case : विठाबाई नामदेव जाधव (४९, रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड ह.मु. खर्दे ता. धरणगाव ) असे मृत महिलेचे तर नामदेव रामा जाधव (५१ ) असे आरोपी पतीचे नाव आहे.

साप चावल्याचा केला होता बनाव, पत्नीच्या डोक्यात लाकूड घालून खून
धरणगाव जि. जळगाव : पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून तिचा खून केल्याची घटना खर्दे ता. धरणगाव येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. आरोपी पतीस अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पत्नीला साप चावल्याचा बनाव करुन पतीने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. चेहऱ्यावर झालेली मारहाणीवरुन पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. विठाबाई नामदेव जाधव (४९, रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड ह.मु. खर्दे ता. धरणगाव ) असे मृत महिलेचे तर नामदेव रामा जाधव (५१ ) असे आरोपी पतीचे नाव आहे.
 नामदेव  याच्यासह विठाबाई ही  खर्दे येथील विटभट्टीवर काम करून उदरनिर्वाह करीत होती.  गुरुवार ३० डिसेंबर रोजी सायंकाळी नामदेव याने विठाबाईस विटभट्टीसाठी कोळसा आणि गवत आणायला सांगितले.  यावरुन दोघांमध्ये वाद झाला.  विठाबाई ही दारु प्यालेली असल्याने ती नामदेव यास शिवीगाळ करीत होती.  यामुळे नामदेव याने रागाच्या भरात जवळ पडलेला लाकडी दांडा उचलून विठाबाईच्या डोक्यात टाकला आणि मारहाणही केली.  नामदेव याने पत्नीला साप चावल्याचा बनाव करून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. नंतर तिला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे रात्री तीचा मृत्यू झाला. 
दरम्यान,  चेहऱ्यावरील घाव व मारहाण याचा प्राथमिक अंदाज पाहून पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी शनिवार १ रोजी  पोलिसांनी नामदेव यास ताब्यात घेत चौकशी केली.  त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयित आरोपी नामदेव जाधव याच्या विरोधात रविवारी सकाळी  धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.