पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 22:01 IST2025-08-03T21:59:13+5:302025-08-03T22:01:39+5:30

Young Woman Kills Married Live-In Partner: दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लिव्ह इन पार्टनर महिलेने घरातील चाकूने छातीत सपासप वार केले आणि त्याला संपवले.  

He started living in a live-in relationship because his wife was ill, and his girlfriend killed him; What caused the rift between the two? | पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

Live-In Partner Murder News: २७ वर्षीय तरुणीने ४० वर्षीय विवाहित लिव्ह इन पार्टनरची चाकूने सपासप वार करत हत्या केली. दोघांमध्ये शनिवारी घरात वाद झाला. वाद वाढला आणि संतापाच्या भरात तरुणीने त्यांच्यावर वार केले. गुरुग्राममध्ये ही घटना घडली असून, पोलिसांनी तरुणीला अटक केली. तिने हत्या केल्याची कबुली दिली असून, हत्येचे कारणही सांगितले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गुरुग्राममधील डीएलएफ फेज ३ मध्ये एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. हरीश शर्मा असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर यशमीत कौर असे हत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. 

पत्नी आजारी, यशमीतसोबत लिव्ह इन रिलेशन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश शर्मा याची पत्नी दीर्घ काळापासून आजारी आहे. तो भंगाराचा व्यावसाय करतो. पत्नीच्या आजारपणाला कंटाळला. एक-दीड वर्षापूर्वी हरीश शर्माची यशमीत कौरसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. 

गुरुग्राममधील बलिवास गावाचा रहिवाशी हरीश शर्मा विवाहित असल्याचे आणि त्याला दोन मुले असल्याचे यशमीत कौरला माहिती होते. यशमीत कौर आणि हरीश शर्मा वर्ष-दीड वर्षापूर्वी त्यांनी भाड्याने फ्लॅट घेतला आणि लिव्ह इन मध्ये राहू लागले.

यशमीत कौरनेच सांगितलं हरीशचा मृत्यू झाला
 
पोलीस अधिकरी संदीप कुमार यांनी सांगितले की, २ ऑगस्ट रोजी नारायण हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला जखमी अवस्थेत आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली. चौकशीतून समोर आले की, मयत हरीश शर्मा यसमीत कौरसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. पत्नी बऱ्याच वर्षांपासून आजारी असल्यामुळे तो यशमीत कौरसोबत राहू लागला होता. 

हरीशच्या कुटुंबीयांनी सांगितले की, हत्या झाली त्याच्या एक दिवस आधी हरीश गावी आला होता. विजय सेठीला तो भेटला. त्यानंतर दोघेही सोबत निघून गेले. रात्री हरीश १६५० रुपये मागितले होते. त्याच्या भाच्याने फोन पे वरून ते पाठवून दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी यशमीत कौरने हरीशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

यशमीत कौरने हरीशची हत्या का केली?

पोलिसांनी चौकशी केली. त्यातून अशी माहिती समोर आली की, यशमीत कौरला हरीशचे त्याच्या पत्नीशी बोलणे आवडत नव्हते. नातेवाईकांशी आणि पत्नी बोलू नको असे ती हरीशला म्हणायची. त्यावरून त्यांच्या वाद व्हायचे. 

शनिवारी रात्री हरीशचे पत्नी बोलला म्हणून यशमीत कौरने वाद घालायला सुरूवात केली. त्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला. यशमीतने किचनमधील चाकू आणला आणि हरीशच्या छातीवर सपासप वार केले. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. यशमीत कौर दिल्लीतील अशोक विहार येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी तिला अटक केली. 

Web Title: He started living in a live-in relationship because his wife was ill, and his girlfriend killed him; What caused the rift between the two?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.