Whatsapp वर पत्नीला त्याने पाठवला गुड मॉर्निंगचा मेसेज अन् पतीने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 06:27 PM2020-02-27T18:27:39+5:302020-02-27T18:32:36+5:30

मेसेजला रिप्लाय दिल्यामुळे आपला जीव गमवून इतकी किंमत मोजावी लागेल हे त्याला कधीच ठाऊक नव्हता.

He sent good morning a message to wife on Whatsapp and her husband killed the youth pda | Whatsapp वर पत्नीला त्याने पाठवला गुड मॉर्निंगचा मेसेज अन् पतीने केली हत्या

Whatsapp वर पत्नीला त्याने पाठवला गुड मॉर्निंगचा मेसेज अन् पतीने केली हत्या

Next
ठळक मुद्देही खळबळजनक घटना झारखंडमधील हजारीबाग शहरातील कटकमदाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. संतप्त ग्रामस्थ व कुटुंबीयांनी हजारीबाग-सिमरिया रस्ता रोखला.

झारखंड - सकाळीच सकाळी मिळालेल्या गुड मॉर्निंग या मेसेजमुळे बरेच लोक खूप खूष होतात. पण झारखंडमध्ये असे घडले आहे की, गुड मॉर्निंग मेसेजने एका तरूणाचा जीव घेतला आहे. मोबाईल मेसेजेला उत्तर देणं इतकं महागात पडेल असं या तरुणाला वाटलं नव्हतं. मेसेजला रिप्लाय दिल्यामुळे आपला जीव गमवून इतकी किंमत मोजावी लागेल हे त्याला कधीच ठाऊक नव्हता.

ही खळबळजनक घटना झारखंडमधील हजारीबाग शहरातील कटकमदाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या परिसरात एका युवकाने सुलताना गावात राहणार्‍या महिलेच्या मेसेजला उत्तर दिले होते. यामुळे चिडलेला महिलेचा नवरा फैसल याने युवकाला चाकू भोसकून ठार मारले. मृत युवकाचे नाव मोहम्मद सलमान अन्सारी (२४) असं असून सलमान सुल्तान गावचा रहिवासी होता. सलमानच्या कुटुंबीयांनी सांगितले की, या युवकाचे फक्त १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.

कटकमदाग येथे राहणाऱ्या महिलेचा दोन दिवसांपूर्वी गुड मॉर्निंग असा मेसेज आला असल्याचा आरोप परिवाराने केला आहे. मृत सलमानच्या पत्नीने तिच्या मैत्रिणीचा मेसेज समजून त्या मेसेजला रिप्लाय दिला. सलमानच्या पत्नीचे माहेर देखील सुल्तान गावात आहे. आरोपी फैसलने हा मेसेज पाहताच त्याने आपल्या पत्नीची विचारपूस केली. पत्नीने सांगितले की,  हा नंबर तिच्या माहेरी राहणार्‍या सलमानचा आहे. यामुळे भडकलेल्या आरोपी फैसल आपला भाऊ आणि दोन माणसांसह पत्नीच्या गावात पोहोचला आणि पत्नीच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पत्नीच्या वडिलांसह आणि काही लोकांसह आरोपी फैसल सलमानच्या घरी पोहोचले आणि त्याची चौकशी केली.


दरम्यान, फैसल आणि सलमानच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला. हे प्रकरण इतके टोकाला गेले की संतप्त आरोपी फैसलने सलमानवर चाकूने हल्ला केला. सलमान जखमी झाला. हे पाहून इतरजण घटनास्थळावरून पळून गेले. जखमी सलमानला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त ग्रामस्थ व कुटुंबीयांनी हजारीबाग-सिमरिया रस्ता रोखला. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

Web Title: He sent good morning a message to wife on Whatsapp and her husband killed the youth pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.