शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

‘तो’ चालवायचा बेकायदेशीरपणे वसतीगृह; 71 बालकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 7:24 PM

Illegal Hostel : डॉक्टरसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कल्याण -  दत्तक प्रक्रिया न करता बाळाची 1 लाखांना खरेदी-विक्री केल्याच्या प्रकरणात आई वडीलांसह डॉक्टर केतन सोनी याच्यावर डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना सोनी हा कल्याणमध्ये बेकायदेशीरपणो नंदादीप फाऊंडेशनच्या नावाने अनाथ व गरजु मुलांचे वसतीगृह चालवत होत असल्याची बाब उघडकीस आली असून याप्रकरणी ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागाच्या वतीने बाजारपेठ पोलिस ठाण्यात सोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात आज संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित वसतीगृहातून 71 बालकांची सुटका करण्यात आली आहे. 2 ते 16 वयोगटातील बालकांना सध्या डोंबिवलीतील एका संगोपन केंद्रासह उल्हासनगर आणि भिवंडी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

बेकादेशीरपणे बाळाची खरेदी विक्री केल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर महिला बालविकास विभागाच्या वतीने अधिक माहीती घेता डॉ सोनी हा कल्याणमध्ये पारनाका, मुरलीधर आळी परिसरात नंदादीप फाऊंडेशनच्या वतीने वसतीगृह चालवित असल्याचे उघड झाले. जिल्हा महिला बाल विकास, ठाणे बाल कल्याण समिती, ठाणो चाईल्ड लाईन या विभागाच्या अधिकारी-सदस्यांनी त्याठिकाणी बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने धाड टाकली. त्यावेळेला त्याठिकाणी 29 मुले आढळुन आली. बालगृह नोंदणीचे व बालकांना संस्थेमध्ये निवासी ठेवण्यासाठीचे कोणतेही आदेश अथवा कागदपत्रे आढळुन आली नाहीत.  मात्र गर्भवती महिलांचे पेपर्स व को-या कागदावर दाम्पत्यांचे अंगठे असल्याचे पेपर्स मिळून आले. मुली कुठे आहेत असे विचारले असता मुली राहत नाहीत असे उत्तर वसतीगृहाच्या कर्मचा-यांकडून देण्यात आले. दरम्यान संस्थेतील सीसीटिव्ही फुटेजमध्ये मंगळवारी रात्री 11.20 च्या दरम्यान काही मुले आणि मुलींना संस्थेपासून 10 मिनिटाचे अंतरावर असलेल्या एका जुन्या बिल्डींगमध्ये 38 बालकांना नेण्यात आल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याठिकाणी धाड टाकली असता संबंधित मुले कोंडलेल्या अवस्थेत आढळुन आली.बालकांची काळजी घेतली जात नव्हती

या संस्थेत बालकांना पुरेसे कपडे, सकस आहार दिला जात नव्हता. तसेच बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नव्हती. बालकांपैकी काही बालकांचे अंगावर त्वचा रोग झालेले असल्याचे दिसून आले.2018 पासून याठिकाणी वसतीगृह बेकायदेशीरपणे चालविले जात आहे दरम्यान याची पुसटशी कल्पना स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणांना नसणो हा चर्चेचा विषय ठरला आहे. 12 ते 16 वयोगटातील 24 जण,  10 ते 16 वयोगटातील 14 मुली आणि 33 मुल-मुली 2 ते 10 वयोगटातील अशी 71 जणांची सुटका तेथून करण्यात आली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरPoliceपोलिसkalyanकल्याण