पुण्याहून आलेल्या अधिकाऱ्याची माहिती ठेवली लपवून, 'त्या' पोलिसावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 22:10 IST2020-04-28T22:02:43+5:302020-04-28T22:10:07+5:30
संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवले आणि या अधिकाऱ्याची मात्र कोणतीच चौकशी न झाल्याबध्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुण्याहून आलेल्या अधिकाऱ्याची माहिती ठेवली लपवून, 'त्या' पोलिसावर गुन्हा दाखल
सांगली : येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या पुण्याहून येवूनही सोमवारी थेट कार्यालयात हजर झाल्याने कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण आहे. कामावर यायला ते घाबरू लागले आहेत. मुंबईहून आलेल्या व तशी माहिती उघड न करणाऱ्या तासगांवच्या महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवले आणि या अधिकाऱ्याची मात्र कोणतीच चौकशी न झाल्याबध्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
Coronavirus : राज्यात आतापर्यंत ८१ हजार गुन्हे, पोलिसांवर हल्ल्यांच्या १५९ घटना
Corona virus : पुणे शहरात ८ पोलिसांना कोरोनाची लागण; शंभरहून अधिक कर्मचारी क्वारंटाईन
या अधिकारी कायमस्वरुपी पुण्यातच स्थायिक आहेत. आठवड्यातून सवडीने येवून त्या कार्यालय चालवितात. फेब्रुवारी महिन्यात त्या थायलंडला गेल्या होत्या. तिकडून आल्यावर त्यांनी पुण्यातील नायडू रुग्णालयात दोन दिवस आवश्यक तपासण्या करून घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्या होम क्वारंटाईन झाल्या. या काळात त्या कार्यालयास गैरहजर होत्या. त्यानंतर त्या २७ मार्चला रजेवर गेल्या. याकाळात या कार्यालयाचा पदभार इचलकरंजीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला. तोपर्यंत रजेच्या काळातील फिटनेस प्रमाणपत्र घेवून त्या थेट कामावरच रुजु झाल्या. पुणे शहर कोरोनाच्या संसर्गातील हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे त्या शहरातून कुणालाच अन्य शहरात प्रवेश दिला जात नाही. दिला तर त्याची तपासणी करून संस्थात्मक विलगीकरण केले जात आहे. या प्रकरणात मात्र तसे कांहीच घडलेले नाही.