He came as a guest and was tortured, raped a minor girl | पाहुणा म्हणून आला अन् अत्याचार करून गेला, अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

पाहुणा म्हणून आला अन् अत्याचार करून गेला, अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

ठळक मुद्देया घटनेची फिर्याद स्वतः पीडित मुलीने राधानगरी पोलीसात दिली आहे .न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दहा डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .

धामोड -कुरणेवाडी ( ता. राधानगरी ) येथील अल्पसंख्यांक समाजातील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पिडीत मुलीच्या भावाच्या सासऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना काल मध्यरात्री घडल्याचे आज उघडकीस आले. या घटनेची फिर्याद स्वतः पीडित मुलीने राधानगरी पोलीसात दिली आहे. याप्रकरणी आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी उर्फ पठाण (वय४३ ) रा .कोगील बुद्रुक तालुका करवीर याला राधानगरी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे . न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दहा डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .
     
घटनेबाबत राधानगरी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,  धामोड पैकी कुरणेवाडी ( ता. राधानगरी ) येथील एका अल्पसंख्यांक कुटुंबामध्ये आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी उर्फ पठाण यांची मुलगी देण्यात आली आहे. तो पाहुणा म्हणून कुरणेवाडी येथे आला होता . त्यावेळी पीडित मुलगीचे वडील मासेमारी व्यवसाय निमित्त बाहेर गेले होते . ते मध्यरात्री परतले . यावेळी घरातील सर्व मंडळी झोपलेली होती त्यामुळे तेही जेवण करून झोपी गेले .याच मध्यरात्री आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी उर्फ पठाण याने पीडित मुलगी एकटीच स्वतःच्या खोलीमध्ये असल्याचे खात्री करून खोलीत तिचे तोंड दाबून धमकी देत तिच्यावरती बलात्कार केला. 'तु चुप बैठ ,अगर चिलाई या घरवालोंको बताया तो जान से मार दुंगा ' अशी धमकी दिली .पहाटे घरातील मंडळी उठण्या अगोदरच त्याने घरातून पोबारा केला. सकाळी मुलीने रात्री  घडला प्रकार आपल्या आईच्या कानावर घातला .

पिडीत मुलगीचे आई वडील व भाऊ यांनी मुलीसह तात्काळ राधानगरी पोलिस स्टेशनची धाव घेत संबंधित आरोपीवर गुन्हा नोंद केला . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राधानगरी पोलिसांनी तात्काळ या आरोपीला कोगील बुद्रुक येथून अटक केली आहे . व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राधानगरी यांच्या समोर हजर केले असता .न्यायालयाने आरोपीस १० डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय डुबल व पोलीस उप निरीक्षक एम .एच.शेख हे करत आहेत . दरम्यान या मुलीच्या शारीरिक तपासणी साठी तिला कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहेत . अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाईसाठी आरोपीला न्यायालयासमोर पुन्हा हजर केले जाईल . असे राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम .एम.एच.शेख यांनी सांगितले .

 "पाहुणा म्हणून आला आणि अत्याचार करून गेला "
         

आरोपी जमीर खुदबुद्दीन उर्फ पठान हा पिडीत मुलगीच्या वडीलांचा व्याही असून त्याची मुलगी पिडीत मुलगीच्या भावाला दिली आहे . मुलगीचे घर बांधण्यासाठी गवंडी घेऊन आला होता . त्याच रात्री जावयाची बहिण एकटीच खोलीत असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार करून त्याने पहाटेच पोबारा केला .

Web Title: He came as a guest and was tortured, raped a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.