जुन्या भांडणाच्या रागातून तलवारीने मारून केले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 18:53 IST2019-08-09T18:50:14+5:302019-08-09T18:53:54+5:30
तू मला शिवीगाळ, मारहाण का करतो, असे विचारल्यावर आरोपीने लोखंडी तलवारीने फिर्यादींच्या डाव्या मांडीवर मारून जखमी केले

जुन्या भांडणाच्या रागातून तलवारीने मारून केले जखमी
पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून लोखंडी तलवारीने वार करून एकाला जखमी केले. चिंचवडच्या अजंठानगर येथे बुधवारी (दि. ७) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीुनसार, मोहन चिन्नप्पा कुऱ्हाडे (वय ३०, रा. अजंठानगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गौतम किसन निकाळजे (वय ४९, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी निकाळजे बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या घराच्याजवळील शाळेजवळून जात होते. त्यावेळी आरोपी कुऱ्हाडे तेथे लोखंडी तलवार घेऊन आला. जुन्या भांडणाच्या कारणावरून तसेच तू मला गंजडी का म्हणाला, या कारणावरून त्याने निकाळजे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तू मला शिवीगाळ, मारहाण का करतो, असे विचारल्यावर आरोपीने लोखंडी तलवारीने फिर्यादींच्या डाव्या मांडीवर मारून जखमी केले. निगडी पालीस तपास करीत आहेत.