त्याने अश्लील फोटो मागितले अन् तिने चक्क पाठविलेही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 11:59 IST2022-05-27T11:58:43+5:302022-05-27T11:59:25+5:30

साताऱ्यातील घटना : सोशल मीडियावर झाली होती ओळख

He asked for pornographic photos and finally sent them! FIR in satara police | त्याने अश्लील फोटो मागितले अन् तिने चक्क पाठविलेही !

त्याने अश्लील फोटो मागितले अन् तिने चक्क पाठविलेही !

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : एकमेकांची मैत्री झाल्यानंतर भान हरपून केलेले कृत्य अंगलट येते, याचा प्रत्यय येथे एका युवतीच्या बाबतीत आला. सोशल मीडियावरून दोघांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीने हद्दच ओलांडली. त्यानं तिच्या खासगी अश्लील फोटोंची मागणी केली अन् तिने पाठविलेही. पण जेव्हा या दोघांचं बिनसलं, तेव्हा त्यांनं ‘तसले’  फोटो तिचा भाऊ, बहीण यांना पाठविले. यावरून संबंधित युवकावर  सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  पीडित तरुणी २४ वर्षांची असून, साताऱ्यातील एका शोरूममध्ये ती नोकरी करत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची आणि पंढरपुरातील एका तरुणाची सोशल मीडियावरून ओळख झाली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्रीही झाली. भेटीदरम्यान दोघांनी एकत्र फोटोही काढले. मात्र, बिनसल्यानंतर त्यानं ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे खासगी अश्लील फोटो मागितले. तिने भीतीपोटी ‘तसले’ फोटो त्याला पाठविलेही. नंतर त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिनं त्याचा नंबर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट ब्लाॅक केले. त्यामुळे संतापलेल्या युवकाने तिचा चुलत भाऊ, बहीण यांच्या अकाऊंटवर ‘तसले’ फोटो पाठविले. 

Web Title: He asked for pornographic photos and finally sent them! FIR in satara police