शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

Hathras Gangrape : पीडितेवर पोलिसांनी जबरदस्तीने केले मध्यरात्री अंत्यसंस्कार, महिला आयोगाने मागितले स्पष्टीकरण

By पूनम अपराज | Published: September 30, 2020 5:28 PM

Hathras Gangrape : या प्रकरणात, राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने उत्तर प्रदेश पोलिसांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे, त्याला आता उत्तर देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी बुधवारी ट्वीट केले की, उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या घटनेत मध्यरात्री अडीच वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली असून मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे काल रात्री सामूहिक बलात्कार पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आला. असा आरोप केला जात आहे की, पोलिसांनी बळजबरीने आणि कुटुंबियांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. या प्रकरणात, राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने उत्तर प्रदेशपोलिसांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे, त्याला आता उत्तर देण्यात आले आहे.महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी बुधवारी ट्वीट केले की, उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या घटनेत मध्यरात्री अडीच वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. असे का? महिला आयोग याचा निषेध करतो. या ट्विटनंतर थोड्याच वेळात रेखा शर्मा यांनी पुन्हा ट्विट केले की, हाथरस घटनेतील पीडितेच्या भावाने आम्हाला आमच्या कार्यालयात फोन करून माहिती दिली की, त्याला व वडिलांना अंत्यसंस्कार ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु पीडितेचा चेहरा पाहण्याची परवानगी नव्हती.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, सीआयडी किंवा एसआयटी चौकशीत पोलिसांच्या बेजबाबदारपणाची देखील चौकशी केली जावी, यासाठी आवाहन मानवाधिकार आयोगात वकिलाने अपील दाखल केले आहे. हे उल्लेखनीय आहे की, यापूर्वी कुटुंबीयांच्या वतीने पोलिसांचे म्हणणे ऐकले नाही आणि घरात कुटुंबियांना बंद करुन जबरदस्तीने अंतिम संस्कार केले, असे विधान केले होते. मात्र, हाथरसचे पोलिस आणि प्रशासनाने वारंवार याला नकार दिला.दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली असून मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. दिल्ली महिला आयोगाने पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण घटनेवर पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने घरातील सर्व कामांमध्ये मदत करून चौथी - पाचवीपर्यंत शिक्षण घेतले होते. ती आमची सर्वात प्रेमळ मुलगी होती, पण शेवटी तिचा चेहरा पाहण्याची परवानगी नव्हती. बुधवारी स्थानिक खासदारही या कुटुंबास भेटण्यास आले, तेथे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारWomenमहिलाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसdelhiदिल्ली