Hathras gangrape: CBI Team reaches At the home of the victim's family, statement will record of the mother and sister in law | Hathras gangrape : CBI ची टीम पीडित कुटुंबियांच्या घरी, आई अन् वाहिनीचा नोंदवणार जबाब

Hathras gangrape : CBI ची टीम पीडित कुटुंबियांच्या घरी, आई अन् वाहिनीचा नोंदवणार जबाब

ठळक मुद्देविक्रांत ही अशी व्यक्ती आहे ज्याची शेती आहे आणि तोच प्रथम घटनास्थळी पोहोचला. कुठेतरी विक्रांतने सीबीआयकडे दिलेल्या जबाबात त्यांनी पीडितेच्या कुटूंबाला संशयाच्या फेऱ्यात अडकवले आहे.

हाथरस प्रकरणाच्या तपासासंदर्भात सीबीआयची टीम पीडितेच्या घरी पोहोचली आहे. आज पीडितेची आई, वहिनी व भावासह कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदविले जातील. चौकशीसाठी सीबीआयच्या डीएसपीसमवेत आणखी एक महिला अधिकारी पथकात आहेत. याआधी शुक्रवारी सीबीआयने हाथरस प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी छोटू उर्फ विक्रांत यांचा जबाब नोंदवला होता.

विक्रांत ही अशी व्यक्ती आहे ज्याची शेती आहे आणि तोच प्रथम घटनास्थळी पोहोचला. कुठेतरी विक्रांतने सीबीआयकडे दिलेल्या जबाबात त्यांनी पीडितेच्या कुटूंबाला संशयाच्या फेऱ्यात अडकवले आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटूंबाचे जबाब खूप महत्वाचे ठरेल. सीबीआय आज पीडितेच्या कुटूंबाला प्रश्न विचारून जबाब नोंदविला जाईल. छोटू उर्फ विक्रांत हा हाथरस प्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी आहे. त्याने आजवर केलेल्या गुन्ह्याच्या घटनेविषयी धक्कादायक खुलासा केला होता.

एसआयटी अहवालाला पुन्हा विलंब

हाथरस सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात तपासासाठी गठित विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल दाखल करण्यास विलंब झाला आहे. यापूर्वी अहवाल दाखल करण्याची मुदत 10 दिवसांनी वाढविण्यात आली होती. एसआयटी आपला तपास अहवाल १७ ऑक्टोबरला सरकारला सादर करणार होती. हाथरस प्रकरणाचा अहवाल एसआयटीला सादर करण्यास किमान तीन दिवस लागू शकतात, असे सांगितले जात आहे. हाथरस प्रकरणाचा तपास करून एसआयटी परत आली आहे, परंतु अहवाल अद्याप तयार नाही.

हाथरस सामूहिक बलात्काराची घटना 14 सप्टेंबर रोजी घडली होती, तर पीडितेचा 29 सप्टेंबरला मृत्यू झाला होता. यानंतर घाईघाईने प्रशासनाने पीडितेवर अंत्यसंस्कार केले, हा बराच वादाचा विषय होता. पीडितेच्या कुटूंबियांनी प्रशासनाच्या हा जलद हालचालीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
 

Web Title: Hathras gangrape: CBI Team reaches At the home of the victim's family, statement will record of the mother and sister in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.