Hathras Gangrape : Akshay Kumar's angry reaction, when will this cruelty stop! Hang the rapists | Hathras Gangrape : अक्षय कुमारची संतप्त प्रतिक्रिया, ही क्रूरता कधी थांबणार! बलात्काऱ्यांना फाशी द्या  

Hathras Gangrape : अक्षय कुमारची संतप्त प्रतिक्रिया, ही क्रूरता कधी थांबणार! बलात्काऱ्यांना फाशी द्या  

ठळक मुद्देही क्रूरता कधी थांबणार? गुन्हेगारांना फाशी द्या, असे म्हणत अक्षय कुमारने आपला रोष व्यक्त केला आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका 19 वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्कारची घटना घडली होती. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान आज दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही क्रूरता कधी थांबणार? गुन्हेगारांना फाशी द्या, असे म्हणत अक्षय कुमारने आपला रोष व्यक्त केला आहे.

या घटनेवर दुःख व्यक्त करताना अक्षय कुमारने ट्वीटद्वारे आपला राग व्यक्त केला आहे. ‘संताप आणि मनःस्ताप. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण, कितीही क्रूरता. कधी थांबणार आहे हे सगळे? आपल्या कायद्याने आता अधिक कडक व्हायला पाहिजे की शिक्षा ऐकताच गुन्हेगार भीतीने थरथर कापला पाहिजे. गुन्हेगारांना फाशी द्या. महिलांच्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी आवाज उठवूया, इतके आपण सगळेच करू शकतो’, अशा कडक शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

 


उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात घडली घटना

उहाथरसच्या चंदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरूणीवर गावातीलच 4 नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मुलीला अलीगडच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. यापूर्वी हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रम वीर यांनी सांगितले होते की 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

Web Title: Hathras Gangrape : Akshay Kumar's angry reaction, when will this cruelty stop! Hang the rapists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.