शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Hathras Case: "त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही, मार लागल्याने झाला मृत्यू" - एडीजी प्रशांत कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 6:17 PM

प्रशांत कुमार म्हणाले, घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या जबाबातही संबंधित तरुणीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे म्हटले नव्हते. तिने केवळ मारहाण झाल्याचा आरोपच केला होता. (Hathras Case, Uttar pradesh)

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 'त्या' 19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही - एडीजीगेल्या 14 सप्टेंबरला हाथरस जिल्ह्यातील चंदपा भागात घडली होती घटना.या प्रकरणावरून देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली आणि आता राजकारणही तापले आहे.

हाथरस -उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 'त्या' 19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही. तिचा मृत्यू गळ्याला जबर मार (दुखापत) लागल्याने आणि त्यामुळे बसलेल्या धसक्याने झाला. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालावरूनही तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट होते, असा दावा उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार (ADG Prashant Kumar) यांनी मंगळवारी केला.

प्रशांत कुमार म्हणाले, घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या जबाबातही संबंधित तरुणीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे म्हटले नव्हते. तिने केवळ मारहाण झाल्याचा आरोपच केला होता. एवढेच नाही, तर सामाजिक सौहार्द खराब करण्यासाठी आणि जातीय हिंसाचार निर्माण करण्यासाठी काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत. पोलिसांनी हाथरसप्रकरणी तत्काळ कारवाई केली आणि आता आम्ही ज्या लोकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आणि राज्यात जातीय हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचा शोध घेणार आहोत, असेही प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.

पोलिसांची प्रतिमा मलीन केली गेली - प्रशांत कुमार म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून याच्या तपासासाठी विशेष शोध पथक तयार केले. एवढेच नाही, तर या घटनेत ज्यांचा समावेश आहे. त्यांना कदापी क्षमा केली जाणार नाही. 'वैद्यकीय अहवाल येण्यापूर्वी सरकारविरोधात चुकीची वक्तव्ये करण्यात आली आणि पोलिसांची प्रतिमा मलीन केली गेली. हे सर्व कुणी केले याचा आम्ही शोध घेणार आहोत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि सरकार तथा पोलीस महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहेत.'

14 सप्टेंबरला झाली होती घटना -एडीजी म्हणाले, आकडेवारीचा विचार केल्यास, 2018 आणि 2019मध्ये, महिलांसंदर्भातील गुन्हांत शिक्षा देण्यात उत्तर प्रदेश अव्वल आहे. गेल्या 14 सप्टेंबरला हाथरस जिल्ह्यातील चंदपा भागात 19 वर्षांच्या एका मुलीवर कथीत बलात्कार केल्याचे म्हटले जात आहे. घटनेच्यावेळी तिचा गळा दबण्यात आला. याच वेळी तिची जीभही तुटली होती.

घटनेनंतर संबंधित तरुणीला अलिगड येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर तिला दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले, येथेच मंगळवारी तिचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली आणि आता यावरून राजकारणही तापले आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारMolestationविनयभंगUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस