घृणास्पद ! ८० वर्षाच्या वृद्धाने १२ वर्षीय गतिमंद मुलीवर केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 17:56 IST2019-07-21T17:54:17+5:302019-07-21T17:56:23+5:30
ही धक्कादायक घटना आसाममधील बिस्वनाथ जिल्ह्यात घडली.

घृणास्पद ! ८० वर्षाच्या वृद्धाने १२ वर्षीय गतिमंद मुलीवर केला बलात्कार
गुवाहाटी - आसाममध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ८० वर्षाच्या वृद्धाने १२ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार केला आहे. ही धक्कादायक घटना आसाममधील बिस्वनाथ जिल्ह्यात घडली. आरोपीचे नाव अनिल सैकीया असे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पीडित मुलीचे आई वडिल कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना अनिल तिच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला भुलवले आणि तिच्यावर बलात्कार केला. मात्र, मुलीने आरडाओरडा केल्याने आजुबाजूचे स्थानिक जमा झाले आणि त्यांनी अनिलला रंगेहाथ पकडले. त्यानंतर लोकांनी अनिलला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, घडलेल्या भयानक प्रकाराचा तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.