शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
3
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
4
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
5
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
6
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
7
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
8
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
9
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
10
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
12
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
13
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
14
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
15
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
16
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
17
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
18
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
19
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
20
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:20 IST

हरियाणा कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी चंदीगडमधील त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या.

७ ऑक्टोबर रोजी हरियाणा कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी चंदीगडमधील त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेच्या एक दिवस आधी ६ ऑक्टोबर रोजी त्यांनी एक मृत्युपत्र तयार केलं होतं, ज्यामध्ये त्यांची सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता त्यांची पत्नी आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी अमनीत पी. ​​कुमार यांच्या नावावर करण्यात आली. त्यांनी नऊ पानांची एक सुसाईड नोट देखील लिहिली होती, जी त्यांनी त्यांच्या पत्नीला पाठवली होती.

आयएएस पत्नी अमनीत पी. ​​कुमार मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत सरकारी दौऱ्यासाठी जपानमध्ये होत्या. पूरन कुमार यांनी सुसाईट नोट पाठवल्यानंतर, अमनीत पी. ​​कुमार यांनी त्यांना १५ वेळा फोन केला, परंतु एकही कॉल रिसिव्ह करण्यात आला नाही. घाबरून अमनीत यांनी त्यांची छोटी मुलगी अमूल्या हिला तिच्या वडिलांकडे ताबडतोब जाण्यास आणि त्यांच्याशी बोलण्यास सांगितलं. आईच्या फोननंतर अमूल्या घरी आली तेव्हा तिला तिचे वडील बेसमेंटच्या सोफ्यावर पडलेले आढळले, त्यांच्या डोक्यातून रक्त येत होतं.

पत्नी वारंवार करत होती फोन

घरातील कुक प्रेम सिंग यांनी सांगितलं की, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पूरन कुमार म्हणाले होते की, ते बेसमेंटमध्ये जात आहेत आणि त्यांना डिस्टर्ब करू नका असं सांगितलं होतं. ते त्या दिवशी त्यांच्या पाळीव कुत्र्यालाही फिरायला घेऊन गेले नाहीत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, ते थोड्या वेळासाठी वरच्या मजल्यावर आले आणि जेवण मागितलं, नंतर परत बेसमेंटमध्ये गेले. याच दरम्यान, त्यांची पत्नी त्यांना वारंवार फोन करत होती, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

सुसाईड नोटमुळे खळबळ

पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या नऊ पानांच्या सुसाईड नोटमुळे पोलीस आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी १५ वरिष्ठ आणि माजी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांवर जातीय भेदभाव, मानसिक छळ आणि सार्वजनिक अपमानासह गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये हरियाणाचे मुख्य सचिव अनुराग रस्तोगी, डीजीपी शत्रुजीत कपूर आणि माजी मुख्य सचिव टी.व्ही.एस.एन. यांचा समावेश आहे.

"कधीही भरून न येणारे नुकसान"

सुसाईड नोटमध्ये, शत्रुजीत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना वारंवार अपमानास्पद पोस्टिंग देण्यात आल्या, त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि खोट्या खटल्यांमुळे ते मानसिकरित्या खूप खचले. त्यांनी सांगितले की मंदिरांना भेट दिल्याबद्दल देखील त्यांना टार्गेट करण्यात आले आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपूर्वी त्यांना रजा नाकारण्यात आली, ज्याचे वर्णन त्यांनी "कधीही भरून न येणारे नुकसान" असं केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : IAS Officer Suicide: Wife's frantic calls, daughter's discovery reveal tragic note.

Web Summary : IPS officer Y. Puran Kumar committed suicide, leaving a note alleging caste discrimination and harassment by senior officials. His wife, an IAS officer, made frantic calls from Japan. His daughter found him. He cited immense mental distress.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू