शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 21:43 IST

कंटेनर जप्त, लकडगंज पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देसंजय गोविंदराव ढोणे (वय ५२) असे या चोरट्याचे नाव असून, तो मानकापूरच्या जय हिंद नगरात राहतो. रहिश जीवना खान (वय ४७) हे हरियाणातील नुह जिल्ह्यातील पू सिंगार पुहना गावचे रहिवासी आहेत.

नागपूर : कुणी सायकल, कुणी दुचाक्या चोरतो, तर कुणी अन्य वाहने चोरतात. नागपुरात मात्र एक असा चोर आहे, जो चक्क ट्रक आणि कंटेनर चोरतो. या चोरट्याच्या लकडगंज पोलिसांनी मुसक्या बांधल्यानंतर ही अफलातून माहिती उजेडात आली.  संजय गोविंदराव ढोणे (वय ५२) असे या चोरट्याचे नाव असून, तो मानकापूरच्या जय हिंद नगरात राहतो.

 रहिश जीवना खान (वय ४७) हे हरियाणातील नुह जिल्ह्यातील पू सिंगार पुहना गावचे रहिवासी आहेत. ते कंटेनर चालवितात. दिल्लीतून कंटेनरमध्ये ब्लँकेट घेऊन खान सोमवारी दुपारी नागपुरात आले. त्यांनी आपला कंटेनर वर्धमान नगरातील एचपी पेट्रोल पंपासमोर लावला आणि चहा नाश्ता करण्यासाठी क्लीनर सोबत हॉटेलमध्ये गेले. चावी कंटेनरलाच लागून होती. ही संधी साधून आरोपी संजय ढोणेने हा कंटेनर पळवून नेला. चहा नाश्ता करून परतल्यानंतर कंटेनर दिसत नसल्यामुळे खान यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह लगेच घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कंटेनरचा माग काढत घटनास्थळापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या धापेवाडा जवळच्या घोटी सिल्लोरी जवळ कंटेनर सापडला. आरोपी संजय ढोणे याला पोलिसांनी अटक केली. ठाणेदार नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक सानप, उपनिरीक्षक सुनील राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक रवि राठोड, हवालदार प्रकाश श्रीराम, नायक वासुदेव जयपुरकर, राम यादव यादव, फिरोज खान, जगदीश परतेकी आणि सचिन बारसागडे यांनी ही कामगिरी बजावली.आतापर्यंत ३४ वाहने चोरली ढोणेची चौकशी केली असता पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती मिळाली. त्याच्याविरुद्धचा हा ३४ वा चोरीचा गुन्हा असून त्यातील २५ गुन्हे ट्रक, कंटेनर चोरीचे आहेत, असे उघड झाले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू        

 

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

 

सख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

भावाची हत्या करून सासरवाडीत जाऊन लपला, चार आरोपी जेरबंद 

टॅग्स :RobberyचोरीArrestअटकPoliceपोलिसnagpurनागपूर