मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 09:40 IST2024-10-09T09:33:51+5:302024-10-09T09:40:16+5:30

हापूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नराधमांनी एका मुलीची छेड काढली. यावेळी मुलीच्या भावाने विरोध केला असता त्याला बेदम मारहाण केली.

hapur shocking crime brother beaten to death for resisting eve teasing | मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नराधमांनी एका मुलीची छेड काढली. यावेळी मुलीच्या भावाने विरोध केला असता त्याला बेदम मारहाण केली. ही तरुणी नवरात्र असल्याने गावातील मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली होती. ती परतत असताना रस्त्यात तिला काही लोकांनी घेरलं.

सध्या पोलिसांनी मुलीच्या भावाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. याप्रकरणी ५ आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हापूरच्या सिंभावली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. येथे रजापूर गावातील एक मुलगी नवरात्रीच्या काळात पूजा करण्यासाठी जवळच्या मंदिरात गेली होती.

मुलगी परतत असताना गावातील नराधमांनी तिची छेड काढायला सुरुवात केली. यावर मुलीच्या भावाने विरोध करत नराधमांना मारण्याचा प्रयत्न केला. याचाच राग आल्याने नराधमांनी त्यांच्या इतर आणखी काही साथीदारांना बोलावलं. साथीदार काठ्या घेऊन घटनास्थळी आले आणि त्यांनी मुलीवर तसेच तिच्या भावावर हल्ला केला.

बेदम मारहाण केल्यानंतर ते पळून गेले. माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. मुलीच्या भावाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती पोलीस-प्रशासनाला मिळताच सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 

Web Title: hapur shocking crime brother beaten to death for resisting eve teasing