उत्तर प्रदेशातील हापूरमधील एका खासगी शाळेच्या प्रिन्सिपलचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये प्रिन्सिपल एका सात वर्षांच्या विद्यार्थिनीला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देते. व्हिडिओमध्ये प्रिन्सिपल शाळेच्या ऑफिसमध्ये उभी आहे. मुलीचे वडील शाळेत येताच ती संतापली.
रागाच्या भरात प्रिन्सिपल विद्यार्थिनीच्या वडिलांची कॉलर धरते आणि म्हणते, "२० नोव्हेंबरपर्यंत तुमच्या मुलीला शाळेतून काढा नाहीतर मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन." कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण वाद एका क्षुल्लक कारणावरून सुरू झाला. मुलीने वर्गात मस्ती केली होती, ज्यामुळे प्रिन्सिपल संतापली. वडील मुलीला घेण्यासाठी शाळेत आले तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, प्रिन्सिपल वारंवार "मी तुम्हाला मारून टाकीन" असं मोठमोठ्याने ओरडत आहेत, तर जवळ उभे असलेले इतर पालक आणि कर्मचारी गप्प उभे आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, परिसरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे.
जिल्हा दंडाधिकारी अभिषेक पांडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे आणि जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कुटुंबाने प्रिन्सिपलवर जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या या व्हिडीओची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
Web Summary : A principal in Uttar Pradesh threatened to kill a student and her family. The incident, sparked by a minor classroom issue, escalated when the father arrived. A video of the threat went viral, leading to police complaints and an investigation.
Web Summary : उत्तर प्रदेश में एक प्रिंसिपल ने एक छात्र और उसके परिवार को जान से मारने की धमकी दी। कक्षा में एक मामूली मुद्दे से शुरू हुई यह घटना पिता के आने पर बढ़ गई। धमकी का एक वीडियो वायरल हो गया, जिसके बाद पुलिस में शिकायत दर्ज कराई गई और जांच शुरू हो गई।