हात, गळा ओढणीने बांधून केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी अपहरण करून पीडितेला नेले जंगलात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 19:52 IST2022-01-04T19:50:33+5:302022-01-04T19:52:04+5:30
Gangrape And Murder Case : पीडित मुलीच्या गुप्तांगाला ३० हून अधिक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तिला जीवे मारल्यानंतरही नराधमांनी तिची अब्रू लुटली.

हात, गळा ओढणीने बांधून केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी अपहरण करून पीडितेला नेले जंगलात
राजस्थानमधील बुंदी येथे १६ वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आले आहे की, तिची हत्या केल्यानंतरही तिन्ही नराधमांनी तिच्यावर बलात्कार सुरूच ठेवला होता. ती मुलगी शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करत राहिली आणि नंतर नराधमांनी तिची गळा दाबून खून केला.
पीडित मुलीच्या गुप्तांगाला ३० हून अधिक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तिला जीवे मारल्यानंतरही नराधमांनी तिची अब्रू लुटली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, पीडितेचा गळा आणि हात तिच्या ओढणीने बांधलेले, त्यानंतर आरोपी तिच्यावर बलात्कार करत होते. बुंदी पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याने आपल्या आयुष्यात अशी क्रूरता कधीच पाहिली नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नुकतेच बुंदी येथे 16 वर्षीय आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. नातेवाइकांनी शोध घेतला असता मुलीचा मृतदेह जंगलात आढळून आला. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तरुणीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.
ही घटना बुंदी जिल्ह्यातील बसोली पोलीस स्टेशन हद्दीतील काला कुआन गावातील आहे. येथे तीन नराधमांनी १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला जंगलात नेले आणि सामूहिक बलात्काराची घटना घडवून आणल्यानंतर प्रथम तिचा गळा दाबून खून केला आणि तिचे डोके दगडाने ठेचले. त्यांनी मुलीला ओढत जंगलात नेले.
कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला तेव्हा गावातील एका महिलेने सांगितले की, मुलीच्या किंचाळण्याचा आवाज जंगलातून आला होता. मुलीचे वडील तिला शोधण्यासाठी गेले असता तेथे पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. चौकशीत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हृदय पिळवटून टाकणारी क्रूरता समोर आली.