डोक्यात हातोड्याने वार केले, मोठ्या भावाने धाकटा भाऊ आणि त्याच्या पत्नीला ठार मारले,धक्कादायक कारण आलं समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 18:11 IST2021-09-26T18:09:49+5:302021-09-26T18:11:24+5:30

Crime News: मोठ्या भावाने लहान भाऊ आणि त्याच्या पत्नीवर हातोड्याने वार करून त्यांची हत्या केली. (Crime News) कुटुंबात झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.

Hammer hit in the head, elder brother kills younger brother and his wife | डोक्यात हातोड्याने वार केले, मोठ्या भावाने धाकटा भाऊ आणि त्याच्या पत्नीला ठार मारले,धक्कादायक कारण आलं समोर 

डोक्यात हातोड्याने वार केले, मोठ्या भावाने धाकटा भाऊ आणि त्याच्या पत्नीला ठार मारले,धक्कादायक कारण आलं समोर 

वाराणसी - संपत्तीच्या वादातून नात्यांचाच खून झाल्याची धक्कादायक घटना वाराणसीमध्ये घडली आहे. येथे संपत्तीच्या हव्यासामधून मोठ्या भावाने लहान भाऊ आणि त्याच्या पत्नीवर हातोड्याने वार करून त्यांची हत्या केली. (Crime News) कुटुंबात झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी असलेला भाऊ घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. (Hammer hit in the head, elder brother kills younger brother and his wife)

ही घटना लोहता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहीमपूर क्षेत्रात घडली आहे. येथे मुन्ना नावाच्या व्यक्तीने आपला लहान भाऊ निसार आणि त्याची पत्नी खुशबू हिची हत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये जी माहिती समोर आली ती ऐकून सर्वांनाच धक्का बसला. या हत्याकांडामागे संपत्तीचा वाद असून, त्यामधूनच भावानेच भाऊ आणि त्याच्या पत्नीची हत्या केल्याचे समोर  आले.

दोन्ही भावांमध्ये संपत्तीबाबत वाद सुरू होता. यादरम्यान, आज लहान मुलाला जेवण भरवणे खुशबू आणि तिच्या पतीला महागात पडले. मोठ्या भावाने यावर आक्षेप घेत शिविगाळ सुरू केली. जेव्हा लहान भावाने त्याला अडवले तेव्हा त्याने हातोड्याने वार करत त्याने त्याचा खून केला. त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेली खुशबूही गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

एडीजी ब्रिज भूषण यांनी सांगितले की, भाऊ आणि त्याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर मुन्ना घटनास्थळावरून फरार झाला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी सांगितले की, या हत्या करण्यासाठी हातोड्याचा वापर करण्यात आला. हा हातोडा घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.  
 

Web Title: Hammer hit in the head, elder brother kills younger brother and his wife