रावेतमध्ये हॉटेलमालकावर प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 16:23 IST2019-04-29T16:20:58+5:302019-04-29T16:23:08+5:30

रावेत येथील एका हॉटेल मालकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला

A half murder attack on a hotel owner in Ravet | रावेतमध्ये हॉटेलमालकावर प्राणघातक हल्ला 

रावेतमध्ये हॉटेलमालकावर प्राणघातक हल्ला 

पिंपरी : रावेत येथील एका हॉटेल मालकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रावेत येथील राजवाडा हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली.
विजय ढुमे असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे. हॉटेल चालक दिनाकर शेट्टी याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रावेत येथे राजवाडा हॉटेल आहे. रविवारी ड्राय डे होता. विजय ढुमे हे हॉटेल मधून घरी निघाले होते. पार्किंग मध्ये स्वत:च्या मोटारीत बसले असताना दुचाकीवरून काहीजण तेथे आले.
त्यांनी ढूमे यांच्याकडे दारुची मागणी केली. मात्र ड्राय डे असल्याने ढूमे यांनी नकार दिला. त्यावेळी त्यांना मोटारीतून खाली खेचुन त्यांच्यावर लाकडी दांडके आणि कोयत्याने वार करण्यात आले.  हल्ला करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तपास पोलीस करत आहेत.

Web Title: A half murder attack on a hotel owner in Ravet