शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

नागपुरात अडीच तासात एक 'हाफ' एक 'फूल्ल मर्डर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:04 AM

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एकाची चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाने धावपळ निर्माण झाली असतानाच तिकडे रात्री ८ च्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची चार ते पाच आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केली.

ठळक मुद्देसीताबर्डी, लकडगंजमध्ये खळबळ : मेयोत तणाव, मोठा पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एकाची चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाने धावपळ निर्माण झाली असतानाच तिकडे रात्री ८ च्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची चार ते पाच आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केली. अवघ्या अडीच तासात हत्येचा प्रयत्न हत्या असे दोन गुन्हे घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.काही दिवसापूर्वी झालेल्या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी मोमीनपुऱ्यातील मोहम्मद जैदूल अमान (वय १८) नामक तरुणाला चार अल्पवयीन आरोपींनी सीताबर्डीत मिठा निम दर्गाह जवळ अडविले. तेथे हमरीतुमरी करत चौघांनी जैदुलवर चाकूने हल्ला चढवला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचे पाहून अनेकांनी तिकडे धाव घेतली. आरोपींना अडवून जखमीला वाचविण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांना कळविले. पोलीस उपनिरीक्षक पवार आपल्या साथीदारांसह तिकडे पोहचले. जखमी तरुणाला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले. ते सर्व अल्पयवीन असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. १५ दिवसापूर्वी जैदुलसोबत वाद झाला त्यावेळी त्याने मारहाण केल्यामुळे आरोपी मयंक आणि साथीदारांनी बदला घेण्यासाठी हा गुन्हा केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले. वृत्त लिहिस्तोवर सीताबर्डी पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू होती. तिकडे मेयोत जैदुलचे नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येत जमल्याने तणावाचे वातावरण होते.मस्कासाथ पुलावर थरारमस्कासाथ पुलाजवळ चार ते पाच आरोपींनी चाकूने भोसकून एकाला ठार मारले. तर, त्याला वाचविण्यासाठी धावणाऱ्याला जखमी केले. मृताचे नाव सुभाष विश्वकर्मा (वय अंदाजे ३० वर्षे) असल्याची माहिती पोलिसांकडून पुढे आली होती. मृत तरुण भिलाई (छत्तीसगड) येथील रहिवासी होता. तो कामाच्या शोधात नागपुरात आला होता. शनिवारी रात्री तो आपल्या मित्रांसह मस्कासाथ पुलाजवळ उभा असताना अज्ञात कारणावरून वाद घालून आरोपींनी त्याला भोसकल्याचे समजते. मृत मिळेल ते काम करायचा आणि मजुरांच्या ठिय्यावर कुठेही झोपायचा, असा त्याचा दिनक्रम होता. हत्येचे कारण आणि आरोपीचा शोधात असल्याचे लकडगंजचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी लोकमतला सांगितले. या घटनेमुळे मस्कासाथ पुलाजवळ रात्री ११ वाजतापर्यंत तणावाचे वातावरण होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून