जिम चालकाला तरुणीसोबत असभ्य वर्तन करणं, जोड्याने धु धु धुतले, व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 22:12 IST2022-02-09T22:11:55+5:302022-02-09T22:12:54+5:30

Gym driver misbehaves with young woman : व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या पोलिसांनी आरोपी जिम चालकावर कारवाई केली आहे.

Gym driver misbehaves with young girl, assaulted him by chappal, video goes viral | जिम चालकाला तरुणीसोबत असभ्य वर्तन करणं, जोड्याने धु धु धुतले, व्हिडिओ झाला व्हायरल

जिम चालकाला तरुणीसोबत असभ्य वर्तन करणं, जोड्याने धु धु धुतले, व्हिडिओ झाला व्हायरल

इंदूरच्या भंवरकुआन पोलीस स्टेशन परिसरात जिम चालकाला मुलीसोबत असभ्य वर्तन करणं इतकं महागात पडलं की, मुलीने जागीच चप्पलेने धुलाई केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या पोलिसांनी आरोपी जिम चालकावर कारवाई केली आहे.

इंदूरच्या भंवरकुआन पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणीने एका तरुणाला जोडे मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विष्णुपुरी येथील जीमचालक कृष्णपाल पनवार हा संध्याकाळी उशिरा वैयक्तिक कामासाठी जात असताना त्याच्या वाहनाची दुसऱ्या मुलीच्या वाहनाला धडक बसली आणि दोघांमधील बाचाबाची इतकी टोकाला गेली की तरुणाने तरुणीसोबत असभ्य वर्तन केले. त्याला अपमानास्पद म्हणालात तरी वावगं ठरणार नाही. यानंतर रस्त्यावरून जाणारे लोक जमावासह घटनास्थळी जमा झाले आणि हा सगळा प्रकार पाहू लागले.

इंस्टाग्रामवर मित्रांनी बनवले फेक अकाउंट, अश्लील फोटो, कमेंट्समुळे व्यथित होऊन तरुणीने केली आत्महत्या 

गर्दी पाहून पोलीस घटनास्थळी पोहोचले, तरुणाला कारमध्ये बसवले, त्याचवेळी तरुणीने तरुणाला जोड्याने मारहाण केली. तिथे उभ्या असलेल्या काही लोकांनी एक व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जिम संचालकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Gym driver misbehaves with young girl, assaulted him by chappal, video goes viral