काकाच बनला राक्षस! घरच्यांना झोपेच्या गोळ्या देऊन पुतणीसोबत केलं धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 15:29 IST2023-02-01T15:29:06+5:302023-02-01T15:29:50+5:30
मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या पुतणीवर लैगिंक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

काकाच बनला राक्षस! घरच्यांना झोपेच्या गोळ्या देऊन पुतणीसोबत केलं धक्कादायक कृत्य
मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या पुतणीवर लैगिंक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे अंघोळ करताना आरोपीने अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर आरोपींनी या विद्यार्थिनीला या व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी काकाने मुलगी घरी आल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीने मुरार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीचा काका सोनू जाटव काही महिन्यांपूर्वी ग्वाल्हेरमध्ये राहायला आला होता. त्या काकाने अल्पवयीन अंघोळ करताना तिचा अश्लील फोटो व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्रास देत होता. आरोपी गेल्या महिन्यात भाचीला लाल टिपरा येथील संकुलात बोलावले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी तिचा सतत छळ करत होता. आरोपीची हिंमत इतकी वाढली होती की आरोपी मुलीच्या घरी येऊन सतत बलात्कार करत होता.
प्रियेसीला घेवून दुचाकीवरुन निघाला, अंधारात वाटेतच विहिरीत कोसळला; युवतीचा बुडून मृत्यू
'अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार, आरोपी इतका क्रूर होता की तो अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत बलात्कार करत होता. आरोपी हा नात्याने मुलीचा काका होता, त्यामुळेच त्याच्या येण्या-जाण्याबाबत घरच्यांनाही शंका आली नाही. आरोपी काका आपल्यासोबत नशेच्या गोळ्या आणायचा आणि चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून त्या मुलीच्या आई-वडिलांना आणि भावाला द्यायचा. मुलीचे आई-वडिल गाढ झोपेत असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. अखेर वैतागून अल्पवयीन मुलीने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला.
14 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून मुरार पोलिसांनी आरोपी काका सोनू जाटवविरुद्ध एफआयआर नोंदवला. मुरार पोलिसांनी आरोपी सोनूविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर लगेचच मुरार पोलिसांनी कारवाई करत आरोपी काका सोनूला लाल टिपरा परिसरातून अटक केली. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे.