कर्नाटकमधून पुण्याकडे जाणारा १० लाख ४ हजार रुपये किंमतीचा गुटखा पंढरपुरात जप्त
By Appasaheb.patil | Updated: August 26, 2022 13:26 IST2022-08-26T13:24:00+5:302022-08-26T13:26:41+5:30
Crime News : कर्नाटकमधून आलेला लाखो रुपयांचा गुटखा सांगोला मार्गाने पंढरपूर शहरातील भक्ती मार्ग या रस्त्यावरून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती शरद कदम यांना मिळाली.

कर्नाटकमधून पुण्याकडे जाणारा १० लाख ४ हजार रुपये किंमतीचा गुटखा पंढरपुरात जप्त
पंढरपूर - कर्नाटकमधून पुण्याकडे जाणारा १० लाख ४ हजार रुपयांचा गुटखा व ७ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १७ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनी सी व्ही केंद्रे यांनी दिली.
कर्नाटकमधून आलेला लाखो रुपयांचा गुटखा सांगोला मार्गाने पंढरपूर शहरातील भक्ती मार्ग या रस्त्यावरून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती पो कॉ. शरद कदम यांना मिळाली. तत्काळ त्यांनी ही माहिती उप विभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, सपोनी सी व्ही केंद्रे यांना सांगितले.
त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सी. व्ही. केंद्रे, सपोफौ राजेश गोसावी, सुरज हेंबाडे, पोहेकॉ शरद कदम, पोना. सुनिल बनसोडे, दादा माने, राकेश लोहार, सचिन हेंबाडे, सुजित जाधव यांनी त्या ठिकाणी सापळा रचला. यानंतर एम एच १२ टि व्ही ३९३६ या क्रमांकाचे संशयित वाहन थांबवले. त्यातील गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.