स्पा रिसेप्शनिस्टचा खळबळजनक आरोप, रोज 10 ते 15 ग्राहक करतात रेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 14:55 IST2022-09-17T14:55:00+5:302022-09-17T14:55:10+5:30
Crime News : एका रिक्शा चालकाच्या मुलीने शुक्रवारी सांगितलं की, तिला यादरम्यान तिला काहीच मदत मिळाली नाही. एक व्यक्ती रूममधून बाहेर निघतो आणि दुसरा बाहेर निघतो.

स्पा रिसेप्शनिस्टचा खळबळजनक आरोप, रोज 10 ते 15 ग्राहक करतात रेप
Crime News : गुरूग्रामच्या एका मॉलबाहेर स्पामध्ये रिसेप्शनिस्टचा जॉब करणाऱ्या तरूणीने खळबळजनक आरोप केला होता. तिने आरोप केला की, 10-15 ग्राहक रोज रेप करतात. आपल्या परिवाराला आर्थिक मदत करण्यासाठी ती तिथे काम करत आहे. या तरूणीने सांगितलं की, हे स्पा सेंटर एका वेश्यालयासारखं चालवलं जातं. एका रिपोर्टनुसार, एका रिक्शा चालकाच्या मुलीने शुक्रवारी सांगितलं की, तिला यादरम्यान तिला काहीच मदत मिळाली नाही. एक व्यक्ती रूममधून बाहेर निघतो आणि दुसरा बाहेर निघतो.
याप्रकरणी बुधवारी महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितलं की, तिने स्पा चा मालक आणि इतर तीन लोकांविरोधात गॅंग रेपचा आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. चारही लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नव्हती.
पोलिसांनी सांगितलं की, तरूणीने जे सांगितलं त्याची चौकशी केली जात आहे. तरूणीच्या जबाबात काही गोष्टी स्पष्ट नाहीत. तरूणीने सांगितलं की, तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून स्पा चालवणारे लोक तिला ब्लॅकमेल करत होते. तरूणीने आरोप केला की, जे लोक जास्त पैसे देत होते. त्यांना कोणत्याही प्रोटेक्शनशिवाय संबंध ठेवण्याची सूट दिली जात होती. नंतर तिला एक गोळी दिली जात होती.
दरम्यान गुरूग्रामच्या एका स्पा सेंटरमध्ये कथितपणे पोलिसांनी सेक्स रॅकेटचा भांडाफोड काही दिवसांपूर्वीच केला होता. याप्रकरणी दोन महिलांसहीत 4 लोकांना अटक करण्यात आली होती. हे स्पा सेंटर गुरूग्रामच्या सेक्टर 51 मध्ये आहे. इथे अटक करण्यात आलेल्या महिला छत्तीसगढच्या राहणाऱ्या आहेत.