धक्कादायक! इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार, आईला पाठवला व्हिडीओ अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 10:19 IST2023-02-02T10:18:55+5:302023-02-02T10:19:01+5:30

गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे, आरोपीने मुलीच्या आईच्याला अश्लील व्हिडीओ पाठवल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

gurugram instagram friend rape girl in hotel send video to her mother | धक्कादायक! इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार, आईला पाठवला व्हिडीओ अन्

धक्कादायक! इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार, आईला पाठवला व्हिडीओ अन्

गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे, आरोपीने मुलीच्या आईच्याला अश्लील व्हिडीओ पाठवल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या त्या आरोपीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री झाली.  यानंतर आरोपीने इन्स्टाग्रामवरुन पीडितेला अश्लील व्हिडीओ कॉल केला. 

आरोपीने मुलीला गुरुग्राममधील हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. 'आरोपींनी तिला गेल्या आठवड्यात पुन्हा दोनदा हॉटेलमध्ये बोलावले. यावेळी त्याने मुलीचे अश्लील व्हिडीओ आणि चित्रे ऑनलाइन शेअर करण्याची धमकी देऊन तिला भेटण्यासाठी दबाव टाकत होता, अशी माहिती मुलीच्या आईने दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, "मंगळवारी आरोपीने माझ्या मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. ही फोटो व्हिडीओ समोर आल्यानंतर आईने मुलीले फोटो, व्हिडीओ संदर्भत विचारले. यावेळी तिने संपूर्ण घटना सांगितली. 

तक्रारीनंतर, महिला पोलीस ठाण्यामध्ये आरोपी राज द्विवेदी विरुद्ध पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12, आयपीसीच्या कलम 506 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 ए अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.  “एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी छापे टाकण्यात आले आहेत.

धक्कादायक! मुलीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून वडिलांचा संयम सुटला, आधी उचलले टोकाचे पाऊलं अन्...

काही दिवसांपूर्वी गुरुग्रामच्या सेक्टर-9ए भागात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी एफआयआर नोंदवून दोन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत सामूहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: gurugram instagram friend rape girl in hotel send video to her mother