पोलीस चौकीतच गुंठामंत्र्याकडून पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 05:23 PM2021-01-17T17:23:28+5:302021-01-17T17:24:02+5:30

Crime News : ही घटना एरंडवणा पोलीस चौकीत १५ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.

Gunthamantri beats the police at the police station | पोलीस चौकीतच गुंठामंत्र्याकडून पोलिसाला मारहाण

पोलीस चौकीतच गुंठामंत्र्याकडून पोलिसाला मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देकोथरुड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करुन राहुल भरम याला अटक केली आहे.

पुणे : दोघांच्या भांडणातील दुसर्‍याची तक्रार आधी घेत असल्याचे रागावलेल्या गुंठामंत्र्याने पोलीस चौकीत पोलिसाला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी राहुल लक्ष्मण भरम (वय ४८, रा. केळेवाडी, पौड रोड, कोथरुड) याला अटक केलीआहे. यापूर्वी मी तीन-चार पोलिसांना मारले, तुलाही सोडणार नाही, अशी धमकी त्याने पोलीस कॉन्स्टेबलला दिली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुभ रवींद्र निढाळकर यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना एरंडवणा पोलीस चौकीत १५ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, राहुल भरम आणि राहुल वाघ यांच्या भांडणे झाली होती. दोघेही तक्रार देण्यासाठी एरंडवणा पोलीस चौकीत आले होते. त्यावेळी कौस्तुभ निढाळकर यांनी भांडणाच्या तक्रारी शांत राहून एका-एकाने द्या, असे समजावून सांगत होते. राहुल भरम याला बाजूला बसायला सांगितले.

तेव्हा भरम याने तुम्ही त्याची तक्रार का अगोदर घेताय. तुम्ही मला साईडला बसण्यास का सांगता, मी कोण आहे, तुम्हाला माहिती नाही. मी गुंठा मंत्री आहे. तुमची नोकरी घालवीन असे बोलून शिवीगाळ करुन निढाळकर यांच्या नाकाला धडक देऊन धक्काबुक्की करुन दुखापत केली. मी या अगोदर तीन चार पोलिसांना मारले आहे. तुला पण सोडणार नाही. तु मला उद्या भेट बघतो, असे बोलून त्यांना धमकावले. दरम्यान, कोथरुड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करुन राहुल भरम याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पडवळे अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Gunthamantri beats the police at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.