गुणरत्न सदावर्तेंची कारागृहात रवानगी, पोलीस कोठडीची मागणी फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:16 IST2022-04-18T18:12:13+5:302022-04-18T18:16:33+5:30
Gunaratna Sadavarten sent to jail : सरकारी पक्षाने केलेली पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

गुणरत्न सदावर्तेंची कारागृहात रवानगी, पोलीस कोठडीची मागणी फेटाळली
सातारा: गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची सरकारी वकिलांची मागणी न्यायालयाने फेटाळली. आक्षपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सरकारी पक्षाने केलेली पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य सदावर्ते यांनी केले होते. दीड वर्षापूर्वी एका वाहिनीवरती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार उदयनराजे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी सदावर्ते यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. मात्र, त्यांना अटक झालेली नव्हती. आठ दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटीच्या कर्मचाºयांनी हल्ला केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यावेळी सातारा पोलीस शहर ठाण्यातील गुन्ह्यात अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, अॅड. सदावर्ते यांना पोलीस कोठडी मिळाली होती. त्यामुळे पोलिसांना दोन दिवस थांबावे लागले. त्यानंतर अॅड. गुणरत्ने यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सातारा पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्ह्याची माहिती न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी सकाळी सातारा पोलिसांनी अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास त्यांना सातारा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.