शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

भिवंडीत क्रिकेटच्या वादातून एकावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 8:10 PM

Bhiwandi Crime News : क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मैदानाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पायगाव गावात शनिवारी सायंकाळी घडली आहे.

- नितिन पंडीतभिवंडी - भिवंडीत सेनेच्या शाखाध्यक्षासह एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांनाच क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मैदानाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पायगाव गावात शनिवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला आहे का त्यानुषंगाने देखील पोलीस तपास करीत आहेत.प्रफुल तांगडी असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून पायगाव येथे फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते . मात्र या क्रिकेट ग्राऊंडकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने जखमी व हल्लेखोर यांच्या गाड्या समोरासमोर आल्या असता गाड्या मागे घेण्यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली .'' आधी तू गाडी मागे घे , आधी तू गाडी मागे घे '' अशी जोरदार बाचाबाची झाल्यांनतर या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले व त्यांनतर एका तरूणानाने चक्क प्रफुल याच्यावर रिव्हॉल्वर ने पाच राउंड फायर केले . या गोळीबारात प्रफुल गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीवर , पोटावर व हातावर तीन गोळ्या लागल्या असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते . त्यास उपचारासाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . तर गोळीबार करणारा हल्लाखोर तरुण फरार झाला असून भिवंडी तालुका पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली आहे .दरम्यन भिवंडीत लागोपाठोपाठ गोळीबाराच्या घटना घडत असल्याने हल्लेखोरांजवळ हे अवैध रिव्हॉल्वर येतातच कुठून असा प्रश्न सुद्न्य नागरिकांना पडला असून पोलीस प्रशासन याविरोधात कठोर भूमिका का घेत नाहीत असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी