Ex-Boyfriend ने 'सेक्स चॅट' व्हायरल करण्याची दिली धमकी, तरूणीने उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 01:04 PM2021-11-01T13:04:59+5:302021-11-01T13:05:25+5:30

Gujrat Crime News : २३ वर्षीय तरूणीने गांधीनगगरच्या एका कॉलेजमधून पदवी घेतली होती. सोमवारी तिने तिच्या घरातच आत्महत्या केली. तिचे वडील यावेळी त्यांच्या पुतनीच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते.

Gujrat Crime News : A 23 year old women suicide after ex-boyfriend threatens to make sex chats viral in Gandhinagar | Ex-Boyfriend ने 'सेक्स चॅट' व्हायरल करण्याची दिली धमकी, तरूणीने उचललं धक्कादायक पाउल

Ex-Boyfriend ने 'सेक्स चॅट' व्हायरल करण्याची दिली धमकी, तरूणीने उचललं धक्कादायक पाउल

googlenewsNext

गुजरातच्या (Gujrat) गांधीनगरमध्ये सोमवारी एका तरूणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. रिपोर्टनुसार, तिने हे पाउल त्यावेळी उचललं जेव्हा तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डने तिला पुन्हा पुन्हा मित्रांच्या ग्रुपमध्ये तिचं सेक्स चॅट व्हायरल करण्याची धमकी दिली. मानसा पोलिसांनी महिलेच्या मृत्यूप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली.

२३ वर्षीय तरूणीने गांधीनगगरच्या एका कॉलेजमधून पदवी घेतली होती. सोमवारी तिने तिच्या घरातच आत्महत्या केली. तिचे वडील यावेळी त्यांच्या पुतनीच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेव्हा त्यांना मुलाकडून मुलीच्या आत्महत्येबाबत समजलं. ज्यानंतर ते धावत घरी पोहोचले. तेव्हा शेजारी मुलीच्या मृतदेहाजवळ होते.

कसा झाला खुलासा

तरूणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत आणि पोलिसांना तिच्या मृत्यूची सूचना दिली गेली नाही. कारण तिच्या वडिलांना समाजात बदनामीची भीती होती. तरूणीच्या वडिलांनी तिची डायरी वाचल्यावर त्यांना आत्महत्ये मागचं कारण समजलं. तिने तिच्या डायरीमध्ये लिहिलं होतं की, गांधीनगरच्या नारदीपूर गावात राहणाऱ्या रूशी पटेल आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये सेक्स चॅट पोस्ट करण्याची धमकी देत होता. त्याने त्याचं नातं संपवलं होतं. द टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्याला पुन्हा अजून तिच्यासोबत नातं ठेवायचं होतं.

तरूणीने पुढे लिहिलं होतं की, तो धमकी देत होता की, तो त्याचं जीवन संपवेल आणि त्याला असं करण्यासाठी मी भाग पाडल्याचा दोष तिच्यावर टाकेल. यामुळे तिने स्वत:च आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. असं तिच्या वडिलांनी आपल्या पोलीस तक्रारीत सांगितलं.

यूपीमध्ये पतीने अश्लील क्लिप केली शेअर

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरच्या किशनपूर गावात एका २५ वर्षीय महिलेने पतीकडून घटस्फोट दिल्यावर आणि तिचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर आत्महत्या केल्यावर जवळपास दोन महिन्यांनी अशीच एक घटना समोर आली आहे. १८ ऑगस्टला मृत महिलेने पतीविरोधात पोलिसात तक्रार दिली होती की, तिच्या पतीने तिला तीन तलाकच्या माध्यमातून घटस्फोट दिला आणि जबरदस्ती तिच्या मुलाला आपल्याकडे ठेवलं. जेव्हा प्रकरणाची चौकशी सुरू होती तेव्हा पतीने कथितपणे एक अश्लील व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली. ज्यानंतर महिलेने विष पिऊन आत्महत्या केली.
 

Web Title: Gujrat Crime News : A 23 year old women suicide after ex-boyfriend threatens to make sex chats viral in Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.