गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरामध्ये काम करणाऱ्या महिलेने आपल्या मालकिणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा राठोड असं आरोपी महिलेचं नाव आहे. रेखाने आधी शांतिबेन आकेडीवाला यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या जवळ गेली. मात्र या विश्वासामागे तिचा हेतू अत्यंत भयानक होता.
सोन्या-चांदीचे दागिने आणि पैसे यांच्या लोभापोटी तिने संधी मिळताच शांतिबेन यांची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शांतिबेन यांच्या कुटुंबाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. रेखावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आकेडी गावच्या रहिवासी असलेल्या शांतिबेन आकेडीवाला सध्या शहरातील चाणक्यपुरी सोसायटीत राहत होत्या. रेखा राठोड नावाची महिला गेल्या १५ वर्षांपासून या कुटुंबाच्या संपर्कात होती. रेखा केवळ घरकामच नाही तर स्वयंपाकाची जबाबदारीही सांभाळत असे. काळानुसार तिचे या कुटुंबाशी जवळचे संबंध निर्माण झाले होते. विशेष म्हणज रेखा हनुमान टेकरी भागात फर्निचरचा व्यवसायही करायची, ज्यामुळे तिचं या घरी सतत येणं-जाणं होतं.
एक वर्षापूर्वी शांतिबेन यांनी मदतीच्या भावनेतून रेखा राठोडला आपले सोन्या-चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम दिली होती. मात्र, काही काळानंतर जेव्हा शांतिबेन यांनी आपले पैसे आणि मौल्यवान दागिने परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा रेखावर दबाव निर्माण झाला आणि हीच गोष्ट त्यांच्यातील वादाचं कारण ठरली.
२२ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास शांतिबेन रेखाच्या फर्निचरच्या दुकानात गेल्या होत्या. आपल्याविरुद्ध तिथे मृत्यूचा सापळा रचला गेला आहे, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. शांतिबेन दुकानात पोहोचताच रेखा राठोड आणि तिच्या तीन साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की शांतिबेन यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी शांतिबेन यांचा मृतदेह एका गोणीत भरला आणि तो एका निर्जन ठिकाणी असलेल्या नाल्यात फेकून दिला. मात्र, हा कट जास्त काळ टिकू शकला नाही. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. पोलिसांनी मुख्य आरोपी रेखा राठोडसह दोन जणांना ताब्यात घेतलं असून या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत.
Web Summary : In Gujarat, a maid killed her employer, driven by greed for her jewelry and money. The woman had been working for the family for 15 years. Police arrested the maid and two accomplices after the victim's body was found.
Web Summary : गुजरात में, एक नौकरानी ने गहनों और पैसों के लालच में अपनी मालकिन की हत्या कर दी। महिला 15 साल से परिवार के लिए काम कर रही थी। पुलिस ने पीड़िता का शव मिलने के बाद नौकरानी और दो साथियों को गिरफ्तार किया।