मधुचंद्र साजरा करत असतानाच पोलीस आले अन् नवरदेव घर सोडून पळाला, काय आहे नेमकी भानगड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 13:59 IST2022-03-12T13:57:43+5:302022-03-12T13:59:58+5:30
Uttar Pradesh Crime News : आरोपी आपला मधुचंद्र सोडून घरातून फरार झाला. भींतीवरून उडी मारून फरार होण्यात आरोपी यशस्वी ठरला.

मधुचंद्र साजरा करत असतानाच पोलीस आले अन् नवरदेव घर सोडून पळाला, काय आहे नेमकी भानगड?
Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशच्या रामपूर जनपदच्या सैदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे रेप करून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी प्लान केला होता. असं सांगितलं जात आहे की, आरोपी लग्नानंतर त्याच्या पत्नीसोबत पहिली रात्र घालवत होता. तेव्हाच पोलीस आल्याची माहिती मिळाली आणि आरोपी आपला मधुचंद्र सोडून घरातून फरार झाला. भींतीवरून उडी मारून फरार होण्यात आरोपी यशस्वी ठरला. सध्या या घटनेची चर्चा परिसरात रंगली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, आरोपीवर रेपचा गुन्हा आहे.
ही घटना अजीमनगर भागातील आहे. इथे गावातील तरूणीचं शेजारी राहणाऱ्या तरूणासोबत प्रेमप्रकरण होतं. तरूणाने लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर तरूणी न्यायासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली. दोन दिवसांआधी तरूणावर पोलिसांनी रेपचा गुन्हा दाखल केला. पोलीस जागोजागी त्याचा शोध घेत होते. दरम्यान तरूणाने पोलीस कारवाईपासून वाचवण्यासाठी आपसात प्रकरण सॉल्व केलं होतं.
दोन्ही परिवाराच्या सहमतीनंतर गुरूवारी सायंकाळी दोघांचा निकाह करून देण्यात आला. तरूण निकाहानंतर पत्नीला घेऊन घरी पोहोचला. दोघेही रूममध्ये मधुचंद्र साजरा करत होते. यादरम्यान पोलीस तिथे आले. पोलीस आल्याचं समजताच तरूण मागच्या रस्त्याने फरार झाला. पोलीस अधिकारी प्रदीप कुमार म्हणाले की, तरूणावर रेपचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या शोधातच पोलीस गेले होते. त्यांनी सांगितलं की, दोन्ही परिवारात सहमतीने प्रॉब्ले सॉल्व झाला होता. याची आणि त्यांचं लग्न देणार असल्याची माहिती तक्रारदारांनी पोलिसात दिली नव्हती. आरोपीचा शोध घेतला जात आहे.