घरातून पळून जाऊन केलं लव्ह मॅरेज, चौथ्या दिवशी तरूणाच्या या कृत्याने लव्हस्टोरीचा झाला शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 14:55 IST2023-03-22T14:55:26+5:302023-03-22T14:55:35+5:30

Crime News : आरोप आहे की, लग्नानंतर पत्नीच्या कुटुंबियांनी त्याच्यासोबत मारहाण केली आणि त्याला त्रास दिला. यामुळे प्रियकराने आत्महत्या केली.

Groom committed suicide in front of bride after love marriage | घरातून पळून जाऊन केलं लव्ह मॅरेज, चौथ्या दिवशी तरूणाच्या या कृत्याने लव्हस्टोरीचा झाला शेवट

घरातून पळून जाऊन केलं लव्ह मॅरेज, चौथ्या दिवशी तरूणाच्या या कृत्याने लव्हस्टोरीचा झाला शेवट

Crime News : उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एका लव्हस्टोरीचा फारच वेदनादायी अंत झाला. प्रेमी, प्रेयसी आणि नंतर पत्नी बनल्या नंतर पाच दिवसांच्या आत हे नातं उद्ध्वस्त झालं. पतीने आपल्या पत्नीसमोरच जीवन संपवलं. आरोप आहे की, लग्नानंतर पत्नीच्या कुटुंबियांनी त्याच्यासोबत मारहाण केली आणि त्याला त्रास दिला. यामुळे प्रियकराने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या लखीमपुर खीरीच्या सर्वातपुर गावात राहणारा 22 वर्षीय तरूण धीरजचा गावातच राहणाऱ्या रोली गिरीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी 14 मार्चला लखनौला येऊन आर्य समाज मंदिरात लग्न केलं. नंतर ते मडियांव येथील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते.

रोलीने सांगितलं की, 18 मार्चला धीरजने तिला रूममध्ये बंद करून हॉलमध्ये आत्महत्या केली. रोलीचा दावा आहे की, तिने कसातरी दरवाजा तोडून धीरजला खाली उतरवलं आणि लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. गंभीर स्थिती पाहून त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. दोन दिवस उपचार केल्यावर धीरजचा मृत्यू झाला.

धीरजने गळफास घेतल्यावर  रोलीने लगेच सासरे सुनील यांना फोनवरून याबाबत माहिती दिली. त्यानंतर धीरज आणि रोलीचे कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये पोहोचले. धीरजच्या कुटुंबियांनी सून आणि तिच्या परिवारावर अत्याचार केल्याचा आरोप केला. सांगितलं असंही जात आहे की, प्रेम विवाह केल्याने त्याच्या भाओजीला मारहाणही करण्यात आली होती. यामुळे तो दु:खी होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. 

Web Title: Groom committed suicide in front of bride after love marriage