ग्रेटर नोएडामध्ये पोलिसांनी सोमवारी निक्की हत्या प्रकरणात चौथी अटक केली. हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारण्यात आलं. सातत्याने सासरच्या मंडळींनी पैशांची मागणी केली होती. याच दरम्यान माध्यमांशी बोलताना निक्कीच्या आईने प्रशासनाकडे न्याय मागितला आहे. निक्कीच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात संताप आहे. २१ ऑगस्ट रोजी निक्कीच्या सासरच्यांनी आणि तिच्या पतीने मिळून तिला मारहाण करून जिवंत जाळलं.
निक्कीचं कुटुंब सतत आरोप करत आहे आणि आपल्या मुलीसाठी न्याय मागत आहे. निक्कीची आई वसुंधरा यांनी सांगितलं की, "सासरच्यांनी आमच्या मुलीला जाळून मारलं आहे, त्यादिवसानंतर आमच्या घरात अन्न शिजलेलं नाही. त्यांच्या घरात देखील आम्ही शिजू देणार नाही, आम्हाला रक्ताच्या बदल्यात रक्त हवं आहे. जर प्रशासनाने या प्रकरणात काही केलं तर ठीक आहे अन्यथा आम्ही ते स्वतः करू."
निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
"आज संपूर्ण गाव आणि संपूर्ण समाज आमच्यासोबत आहे. निक्कीने आम्हाला त्रास होत असल्याचं सांगितलं तेव्हा लोक म्हणायचे घरामध्ये असं होतं. पण यातच आम्ही आता आमची मुलगी गमावली आहे. आम्हाला न्यायाच्या बदल्यात न्याय हवा आहे, आम्हाला रक्ताच्या बदल्यात रक्त हवं आहे." निक्कीचा पती विपिनने हुंड्यासाठी तिला मारहाण केली, नंतर तिला जाळून मारलं. २१ ऑगस्ट रोजी निक्कीला उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे कुटुंबाने खोटं सांगितलं की, सिलिंडरचा स्फोट झाल्याने निक्की भाजली आहे.
फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
"दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
जेव्हा पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा सिलिंडरचा स्फोट झाल्याचे कोणतेही पुरावे घटनास्थळी सापडले नाहीत. उलट घटनास्थळी थिनरची बाटली आणि एक लाईटर सापडला. सिलिंडर स्फोटाबद्दल कोणी सांगितलं याबाबत आता तपास केला जात आहे. पोलीस फोर्टिस हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज देखील घेतील. जेणेकरून पोलिसांना रुग्णालयात कोण उपस्थित होतं हे कळू शकेल.