डिजिटल रेपप्रकरणी नराधम बाप अटकेत, वेदना होत असल्याने आईला सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:12 IST2022-06-29T16:11:40+5:302022-06-29T16:12:39+5:30
Digital Rape : जबाबात मुलीने वडिलांवर अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला आहे.

डिजिटल रेपप्रकरणी नराधम बाप अटकेत, वेदना होत असल्याने आईला सांगितली आपबिती
ग्रेनो वेस्ट येथील सोसायटीत पाच वर्षांच्या मुलीवर डिजिटल रेप केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात पाठवले. याप्रकरणी मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला होता. जबाबात मुलीने वडिलांवर अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेनो वेस्ट सोसायटीत राहणाऱ्या महिलेने बिसरख कोतवालीमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत असे नमूद करण्यात आले की, १८ जूनच्या रात्री पतीने मुलीवर डिजिटल बलात्कार केला होता. गुप्तांगात दुखत असल्याने मुलीने आईला आपबिती सांगितली. आईने दुखण्याचे कारण विचारले असता रात्री झोपेत असताना डिजिटल रेप झाल्याची तक्रार मुलीने केली. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.
बिसरख कोतवालीचे प्रभारी उमेश बहादूर सिंह यांनी सांगितले की, आईच्या तक्रारीच्या आधारे मुलीच्या वडिलांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती, परंतु तपासात या जोडप्यामध्ये वाद असल्याचे समोर आले आहे. घर दोघांच्या नावावर आहे, मात्र दोघेही स्वतंत्र खोलीत राहतात. काही दिवसांपूर्वी पतीने खोलीबाहेर सीसीटीव्ही लावले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
डिजिटल बलात्कार हा शब्द अलीकडे प्रसिद्धीझोतात आला आहे. डिजिटल हा शब्द जेव्हा बलात्कारासोबत येतो तेव्हा बहुतेक लोक गोंधळून जातात, पण डिजिटल बलात्कार हा शब्द अंक (डिजिट) या शब्दावरून आला आहे. म्हणजे हाताच्या आणि पायाच्या बोटांनी किंवा अंगठ्याने जे अश्लील कृत्य केले जाते त्याला डिजिटल बलात्कार म्हणतात. याच महिन्यात ग्रेनो वेस्ट येथील प्ले स्कूलमध्ये आयकर अधिकाऱ्याच्या तीन वर्षांच्या मुलीवर डिजिटल बलात्काराचे प्रकरण समोर आले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र, अद्यापपर्यंत आरोपीची ओळख पटलेली नाही आणि अटक करण्यात आली नाही. गेल्या महिन्यात, नोएडाच्या सेक्टर-39 पोलीस स्टेशनने डिजिटल बलात्काराच्या आरोपाखाली एका 80 वर्षीय वृद्धाला अटक केली होती. वडिलांवर त्याच्या अल्पवयीन घरगुती नोकरावर सात वर्षांपासून डिजिटल बलात्कार केल्याचा आरोप आहे.