पोलिसांची उत्तम कामगिरी, अपहरण झालेलं एक दिवसाचं बाळ सुखरूप सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 18:56 IST2022-07-24T18:55:40+5:302022-07-24T18:56:39+5:30

Crime News : ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.

Great performance by the police, the kidnapped one-day-old baby was found safe | पोलिसांची उत्तम कामगिरी, अपहरण झालेलं एक दिवसाचं बाळ सुखरूप सापडलं

पोलिसांची उत्तम कामगिरी, अपहरण झालेलं एक दिवसाचं बाळ सुखरूप सापडलं

तासगाव : तासगावातील डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून अपहरण झालेले एक दिवसाचे बाळ भवानीनगर येथे मिळून आले असून बाळ सुखरूप आहे. तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाची यशस्वी कामगिरी.बोगस नर्स म्हणून कामावर येऊन एका महिलेने येथील रुग्णालयातून एक दिवसाच्या चिमुरड्याचे अपहरण केले. हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी पावणेनऊ वाजेच्या दरम्यान घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.

येथील सिद्धेश्वर चौकातील सरस्वती आनंद रुग्णालयात एक महिला प्रसूत झाली. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक महिला नर्स असल्याचे भासवून संबंधितांच्या वाॅर्डमध्ये गेली. तेथून एक दिवसाच्या बालकाला घेऊन आपल्या काखेतील बॅगमध्ये टाकले. या बालकाला घेऊन महिलेने क्षणार्धात पलायन केले. या घटनेने हॉस्पिटलसह शहरात खळबळ उडाली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.
 

Web Title: Great performance by the police, the kidnapped one-day-old baby was found safe