मोठा अनर्थ टळला; पेट्रोल पंपावर द बर्निंग व्हॅनचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 18:55 IST2021-08-12T18:07:04+5:302021-08-12T18:55:00+5:30
Burning Car : पंपावरील कर्मचाऱ्यांनी क्षणाचा विलंब न लावता आग नियंत्रणात आणली.

मोठा अनर्थ टळला; पेट्रोल पंपावर द बर्निंग व्हॅनचा थरार
तुमसर(भंडारा) : पंपावर पेट्रोल भरताना व्हॅनने अचानक पेट घेण्याची घटना येथील बोसनगरातील पेट्रोल पंपावर गुरूवारी दुपारी घडली. पंपावरील कर्मचाऱ्यांनी क्षणाचा विलंब न लावता आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
तुमसर शहरात मुख्य मार्गावर बोसनगरात खंडेलवाल पेट्रोल पंप आहे. या पंपावर गुरूवारी दुपारी पेट्रोल भरण्यासाठी व्हॅन आली. पेट्रोल भरताना टाकी ओव्हरफ्लो होऊन अचानक पेट घेतला. थोडा वेळ काय झाले काहीच कळले नाही. उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक उपकरणांचा वापर करून पाण्याचा मारा केला. त्यामुळे काही वेळातच आग नियंत्रणात आली. येथे पेट्रोल भरणाऱ्यासाठी आलेल्या वाहनधारकांची तारांबळ उडाली. या व्हॅनमध्ये गॅस सिलेंडर होता. मात्र कोणतीच अनुचित घटना घडली नाही.
हॅलो मी शरद पवार बोलतोय! बदल्यांसंदर्भात सिल्वर ओकवरून कॉल आल्याने मंत्रालयात उडाली खळबळ https://t.co/iZ3N6fRHR6
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2021