४० हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 09:11 PM2019-12-18T21:11:22+5:302019-12-18T21:12:16+5:30

बुधवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ४० हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी चारथळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Gramsevak caught on bribe of Rs 40,000 | ४० हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास पकडले

४० हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास पकडले

Next

चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील पळसखेड येथील ग्रामविकास अधिकारी प्रमोद नारायण चारथळ (५०, रा. विष्णूनगर, नवसारी, अमरावती) याला बुधवारी चांदूर रेल्वे तहसील कार्यालय परिसरात ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, पळसखेड ग्रामपंचायत येथे एल.ई.डी. पथदिव्यांच्या कामांचे एम.बी. बूक जिल्हा परिषदेकडे पाठविणे व त्या कामाचा धनादेश सोपविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी प्रमोद चारथळ याने तक्रारदारास रकमेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने २५ सप्टेंबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ७ आॅक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी चारथळ याने एक लाखाची मागणी केली. तडजोडअंती ४० हजार रुपयांची रक्कम देण्याचे ठरले. १८ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीच्या आधारे चांदूर रेल्वे तहसील कार्यालयात सापळा रचला. बुधवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ४० हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी चारथळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यानंतर चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत झाली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, पोलीस हवालदार चंद्रशेखर दहीकर, सुनील व-हाडे, युवराज राठोड, पोलीस शिपाई, अभय वाघ, महेंद्र साखरे, चालक चंद्रकांत जनबंधू यांनी पार पाडली.

Web Title: Gramsevak caught on bribe of Rs 40,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.