ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, सख्ख्या भावाला घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 08:45 IST2020-10-07T08:34:37+5:302020-10-07T08:45:57+5:30

सिन्नर ( नाशिक ) : तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीचे कर्मचारी देविदास कुटे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी  चार ...

Gram Panchayat employee shot dead in sinnar nashik | ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, सख्ख्या भावाला घेतलं ताब्यात

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, सख्ख्या भावाला घेतलं ताब्यात

सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीचे कर्मचारी देविदास कुटे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी 
चार गोळ्या झाडल्या असून त्यात 3 गोळ्या  लागल्याने कुटे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संशयीत सख्या भावासह साथीदारास पोलिसांनी ताब्यात घेतले.

मंगळवारी रात्री 11:30 वाजता ही घटना घडली असून हत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनं गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. 

Web Title: Gram Panchayat employee shot dead in sinnar nashik