विद्यार्थीनींसोबत जबरदस्ती संबंध ठेवत होता महिला कॉलेजचा प्रोफेसर, मग चालवत होता सेक्स रॅकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 13:20 IST2021-11-23T13:15:23+5:302021-11-23T13:20:19+5:30
UP Crime News : पीलीभीतमधील एका कॉलनीत राहणाऱ्या तरूणीने पोलिसांकडे तक्रार दिली की, ती शहरातील एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

विद्यार्थीनींसोबत जबरदस्ती संबंध ठेवत होता महिला कॉलेजचा प्रोफेसर, मग चालवत होता सेक्स रॅकेट
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) पीलीभीतमधून (Pilibhit) मधून विद्यार्थिनीवरील अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका राजकीय महिला महाविद्यालयात सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवण्यात येत असल्याचं समोर आलं. येथील एक प्रोफेसर कॉलेजमधील तरूणींना फसवून आपल्या रूममध्ये नेत होता आणि नशेचे पदार्थ देऊन त्यांच्यासोबत अश्लील व्यवहार करण्यासोबत त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. इतकंच नाही तर तो नंतर या तरूणींना धमकावत बाहेरही इतर लोकांकडे पाठवत होता. हा आरोप एका विद्यार्थिनीने लावला आहे.
पीलीभीतमधील एका कॉलनीत राहणाऱ्या तरूणीने पोलिसांकडे तक्रार दिली की, ती शहरातील एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या कॉलेजमधील गणिताचा प्रोफेसर कामरान आलम खां सेक्स रॅकेट चालवतो. तो कॉलेजमधील विद्यार्थिनींना फसवून नशेचे पदार्थ देत होता. प्रोफेसर तरूणींना अश्लील पुस्तके, सेक्ट टॉइज देऊन त्यांच्यासोबत अश्लील व्यवहार करतो.
आरोप आहे की, कॉलेजमधील तरूणींना आपल्या खाजगी घरात बोलवून त्यांच्यासोबत अश्लील व्यवहार करत तो त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता. जर कुणी तक्रार केली तर त्यांना जीवे मारण्याची धमकीही तो देत होता. पोलिसांनी प्रोफेसर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊनही पाहणी केली.
पोलिसांनी सांगितलं की, तरूणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे. या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केली जात आहे.