बापरे! सरकारी शाळेतील शिक्षकाने गाठला क्रूरतेचा कळस; विद्यार्थ्याला केली मारहाण, मोडला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 14:47 IST2023-02-21T14:45:49+5:302023-02-21T14:47:30+5:30

छोट्याशा चुकीसाठी विद्यार्थ्याला इतकं बेदम मारलं की या मारहाणीत विद्यार्थ्याचा हातच मोडला आहे.

government school teacher brutally thrashes class 9th student | बापरे! सरकारी शाळेतील शिक्षकाने गाठला क्रूरतेचा कळस; विद्यार्थ्याला केली मारहाण, मोडला हात

बापरे! सरकारी शाळेतील शिक्षकाने गाठला क्रूरतेचा कळस; विद्यार्थ्याला केली मारहाण, मोडला हात

सरकारी शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिक्षकाने क्रूरतेचा कळस गाठला आहे. छोट्याशा चुकीसाठी विद्यार्थ्याला इतकं बेदम मारलं की या मारहाणीत विद्यार्थ्याचा हातच मोडला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर कुटुंबीय संतप्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने नववीच्या विद्यार्थ्याला मारहाण केली. ज्यामध्ये विद्यार्थ्याचा हात मोडला आहे. आता कुटुंब शिक्षकाविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे.

कलजीखाल ब्लॉकमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. येथे भूपेंद्र थपलियाल नावाच्या एका शिक्षकाने विद्यार्थ्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे एका भटक्या कुत्र्याने शाळेच्या परिसरात प्रवेश केला होता. यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्याला दोषी ठरवलं आणि मारायला सुरुवात केली. यामध्ये मुलाच्या हाताचं हाड मोडल्याची माहिती समोर आली आहे. 

चिंताजनक गोष्ट अशी आहे की 27 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांची परीक्षा आहे आणि आता वार्षिक परीक्षेत विद्यार्थी कसा बसेल याबद्दल कुटुंबाची चिंता आहे. विद्यार्थ्याच्या हाताला प्लास्टर आहे आणि कुटुंब शिक्षकाविरूद्ध कारवाईची मागणी करीत आहे. अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: government school teacher brutally thrashes class 9th student