शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 13:43 IST

५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन ते १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनापर्यंत विशेष सतर्कता बाळगली जावी. ISIच्या आदेशानुसार अफगान ट्रेंड फियादीन दहशतवाद्यांकडून हल्ला केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देगुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार अफगानी फियादीनचे दहशतवादी यांच्या गोरखपूर निशाण्यावर असल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक, बस स्थानके, मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग व तपासणी वाढविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दबदब्यामुळे गोरखपूर हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार अफगानी फियादीनचे दहशतवादी यांच्या गोरखपूर निशाण्यावर असल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर गोरखपूर जिल्ह्यासह राज्यातील इतर अनेक जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे लक्षात घेता जिल्हा पोलीस प्रशासनाने केवळ आपली तयारीच ठेवली नाही तर कोणत्याही समाजविघातक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जता ठेवली आहे.

शहरातील जवळपास 50 स्थळांवर गुप्तपणे नजर ठेवली जात आहे. भारत-नेपाळ सीमेवर बारीक नजर ठेवून त्यांनी कोणताही दहशतवादी कट रचण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन ते १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनापर्यंत विशेष सतर्कता बाळगली जावी. ISIच्या आदेशानुसार अफगान ट्रेंड फियादीन दहशतवाद्यांकडून हल्ला केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.

 

जवळील जिल्ह्यातही अलर्टदरम्यान, बकरी ईद आणि रक्षाबंधन आणि श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असे महत्त्वाचे सण देखील आहेत. हे पाहता सीएम सिटी गोरखपूर व्यतिरिक्त अयोध्या, फैजाबाद, आग्रा, लखनऊसह डझनभर शहरांत डीजीपी मुख्यालयाने अलर्ट जारी केला आहे.महत्त्वाच्या आस्थापने आणि धार्मिक स्थळांवर हा हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे हाय अलर्टचा संदेश मिळाल्यानंतर गोरखपूर पोलिस प्रशासनातर्फे कोणत्याही दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी तयारी सुरू आहे. दंगलीचा सामना करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मॉकड्रील सुरू आहेत. अतिरिक्त पीएसी कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. नेपाळ सीमेवरील जिल्ह्यातील कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसएसबीला सतर्क राहण्यास सांगितले गेले आहे.एडीजी झोन ​​गोरखपूर दावा  शेरपा यांनी बुधवारी सोनौली बॉर्डरला भेट दिली. हा हाय अलर्ट असलेला भाग मानला जात आहे. गोरखनाथ मंदिराच्या रक्षणासाठी गोरखनाथ खिचडी जत्रेच्या वेळी तयार करण्यात आलेल्या पथकाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक, बस स्थानके, मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग व तपासणी वाढविण्यात येत आहे. कोणतीही दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी अशा प्रकारे कंबर कसण्यात आली आहे.

एसएसपी डॉ. सुनील गुप्ता म्हणाले की, उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात हाय अलर्ट जरी करण्यात आला आहे आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिस पूर्णपणे सज्ज आहेत.विशेष स्थानांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. विशेषत: मंदिर सुरक्षेसाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. छुप्या  कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक कामांवर लक्ष ठेवले जात आहे.

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

 

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

 

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

 

Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न 

 

खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या  

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

टॅग्स :terroristदहशतवादीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस