लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 07:29 PM2020-07-29T19:29:56+5:302020-07-29T19:31:00+5:30

गुन्हे शाखेची कारवाई

Stocks of duplicate N-95 masks worth Rs 21 lakh seized by police from Lower Parel | लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी सफदर हुसैन मोहमद जाफर मोमिन (४२) याला अटक करण्यात आली आहे. तो भिवंडीतील रहिवासी आहे.             रोपीला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला हा साठा कुठे व कसा मिळाला? तो कुणाला याची विक्री करणार होता? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

मुंबई : लोअर परेल येथे एका टेम्पोतून २१ लाख ३९ हजार किंमतीच्या बनावट मास्कचा साठा गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने जप्त केला आहे. याप्रकरणी सफदर हुसैन मोहमद जाफर मोमिन (४२) याला अटक करण्यात आली आहे. तो भिवंडीतील रहिवासी आहे.
            

लोअर परेल परिसरात एक जण बनावट वेनस कंपनीच्या बनावट मास्कची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष तीनला मिळाली. त्यानुसार पथकाने पोद्दार मिल कंपाऊंड परिसरात सापळा रचला.  यावेळी टेम्पोतून आलेल्या एका मोमिनला ताब्यात घेतले. त्याच्या टेम्पोमध्ये २१ लाख ३९ हजार किंमतीचे एन- ९५ मास्कचा साठा  मिळून आला. जप्त केलेले मास्क निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याचा वापर केल्यास धोकादायक ठरू शकतात, त्यानुसार कंपनीच्या अधिकारीनी दिलेल्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  तसेच आरोपीला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला हा साठा कुठे व कसा मिळाला? तो कुणाला याची विक्री करणार होता? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

डोंबिवलीकरांनो सावधान! शहरातील वाहनचोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले

Web Title: Stocks of duplicate N-95 masks worth Rs 21 lakh seized by police from Lower Parel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.